Bharat Banait: मार डालो सर...म्हणत दिल्ली पोलिसांच्या लाठ्या झेलणाऱ्या 'त्या' नागपूरकर तरुणाच्या आईचा संताप; म्हणाल्या, सरकारला शक्य नसेल तर...

Bharat Banait mother reacts to Delhi Police action: नवी दिल्लीत झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या निषेध आंदोलन आणि मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागपूरच्या तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती.
Bharat Banait student protest controversy
Bharat Banait student protest controversySarkarnama
Published on
Updated on

Delhi Police lathi charge on Bharat Banait: नवी दिल्लीत झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या निषेध आंदोलन आणि मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागपूरच्या तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती.

या मारहाणीचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्या तरुणाच्या आई-वडिलांची आज प्रतिक्रिया समोर आली आहे. तरुणांच्या मागण्यांबाबत सरकारला त्यांनी जाब विचारला आहे.

Bharat Banait student protest controversy
Sadabhau Khot : "धर्मेंद्र प्रधानांचा अजिबात राजीनामा घेऊ नका; या आतंकवाद्यांना..."; CJP च्या आंदोलनावर टीका करताना सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य

दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावेळी पोलिसांनी मारहाण केलेल्या तरुणाचं नाव भारत बनाईत असं आहे. आपल्या मुलाला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे वडील कमलाकर बनाईत आणि आई विनता बनाईत यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच पोलिसांवर संताप व्यक्त करताना सरकारलाही धारेवर धरलं आहे. त्यांनी म्हटलं की, "भारत हा नागपुरात सुद्धा अभिजीत दिपकेंच्या आंदोलनात सहभागी झाला होता.

काल दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेला असताना त्याला बेदम मारहाण झाली आहे. ज्या पद्धतीनं त्याला मारहाण झाली आहे ते अत्यंत चुकीचं आहे त्याला पकडून पकडून मारण्यात आलं, तो बाजुला उभा असताना त्याला मारण्यात आलं, दोन-दोन वेळा त्याला मारण्यात आलं हे अत्यंत चुकीचं आहे" असं भारतच्या आईन म्हटलं आहे.

Bharat Banait student protest controversy
Arvind Kejriwal : दिल्ली संसद मार्च : जखमी अन् अटकेतील विद्यार्थ्यांसाठी केजरीवालांची मोठी घोषणा; हेल्पलाईन नंबरसह लिगल टीम तैनात...

तर, "आंदोलनातील ही मुलं आपल्या हक्कासाठी लढत आहेत, ते आतंकवादी नाहीत पण त्यांना अशा पद्धतीनं मारहाण केली जात आहे. सरकारनं कोणालाही मारहाण करू नये. मुलं आपल्या हक्कांसाठी लढत आहेत सरकारला जर कारवाई करणं शक्य नसेल तर तसं सांगावं, अशा पद्धतीने कोणालाही मारहाण करू नये अशी भावना" भारतच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com