Bihar News : JDU नेता कैलाश महतो यांचा खून ; दुचाकीस्वारांकडून गोळीबार..

JDU leader kailash mahto shot dead : जमीनीच्या आर्थिक व्यवहारावरुन हल्ला
 kailash mahto
kailash mahto Sarkarnama

JDU leader kailash mahto shot dead : बिहारमध्ये (Bihar) जनता दल संयुक्तचे (JDU) नेता कैलाश महतो (Kailash Mahto) यांचा कटिहार येथे गोळी झाडून खून करण्यात आला.

दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी जेडीयूचे माजी जिल्हा सरचिटणीस कैलाश महतो यांच्यावर गोळीबार केला. गुरुवारी (ता.२७) रात्री ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 kailash mahto
Mumbai University : सिनेट निवडणूक कधी ? ; वातावरण तापलं, ठाकरे गटाचे पदाधिकारी कुलगुरुंच्या भेटीला..

या हत्यात त्यांना दोन ते तीन गोळ्या लागल्या आहेत. याप्रकरणी बरारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी एका फार्म हाऊसजवळ कैलास महतो यांच्यावर गोळीबार केला.

जखमी अवस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात येण्यात आले. पण उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिस सुत्रांनी सांगितले.

 kailash mahto
APMC Elections News : बाजार समितीच्या निवडणुकीत राडा ; दोन गट भिडले, भाजपची बस थेट मतदान केंद्रावर..

जेडीयू नेता कैलाश महतो (वय ७०) यांच्या पोटाला आणि डोक्याला गोळी लागली. जमीनीच्या आर्थिक व्यवहारावरुन हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

"आपल्या जीवाला धोका असून सुरक्षा मिळावी," अशी मागणी काही दिवसापूर्वी महतो यांनी पोलिसांकडे केली होती. पण त्यांचा सुरक्षा पुरविण्यात आली नाही. कटिहारचे पोलिस अधिकारी ओम प्रकाश म्हणाले, "महतो यांच्या खूनप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. आरोपींना लवकरच पकडण्यात येईल,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com