BJP MLC candidates : भाजपकडून शिक्षक, पदवीधरच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रात सस्पेन्स वाढला...

Teacher constituency election, Graduate constituency election, Maharashtra Legislative Council : महाराष्ट्रात नागपूर, पुणे आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.
Maharashtra MLC BJP candidates
Maharashtra MLC BJP candidatesSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra MLC election 2026 : महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात झाली आहे. भाजपने मंगळवारी बिहार आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील १४ पदवीधर आणि १४ शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. तर २३ ऑक्टोबर रोजी मतदान आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचाही समावेश आहे.

भाजपने मंगळवारी बिहारमधील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसह उत्तर प्रदेशातील तीन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकाही मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा कधी केली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Maharashtra MLC BJP candidates
HIGH Court Election Commission : आयोग पक्षाच्या सल्ल्यानुसार वागला असेल तर मग काय उरले! निवडणूक चिन्हावरून कोर्टाकडून कानउघाडणी

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात नागपूर, पुणे आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. यापैकी अमरावती शिक्षक मतदारसंघ वगळता अन्य महायुतीकडे एकही मतदारसंघ नाही. नागपूर व पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. तर अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेस समर्थित आमदार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे.

महायुतीमध्ये रस्सीखेच

महायुतीमध्ये कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार, यासाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहू शकतो. अन्य चार मतदारसंघांमध्ये नागपूर व पुणे पदवीधरमध्ये भाजप आणि पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही आहे. अद्याप मतदारसंघच निश्चित न झाल्याने उमेदवार जाहीर करण्यासही विलंब होत आहे.

Maharashtra MLC BJP candidates
SC to OBC demand : आम्हाला अनुसूचित जातीत राहायचं नाही, OBC मध्ये समावेश करा! 'या' समाजाने केली धक्कादायक मागणी

महाविकास आघाडीतही संभ्रम

अद्याप महाविकास आघाडीमध्येही मतदारसंघांबाबत शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसकडे विद्यमान तीन जागा असल्याने त्यांच्या भूमिकेकडे राष्ट्रवादी व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अवलंबून असणार आहे. काँग्रेस आपल्या जागा सोडणार का, याबाबत उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com