

Parliament news : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले धर्मेंद्र प्रधान सोमवारी पहिल्यांदाच संसदेत दाखल झाले. यावेळी भाजपच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रधानांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचवेळी विरोधकांकडूनही संसदेच्या मकर द्वार परिसरात आंदोलन सुरू होते.
धर्मेंद्र प्रधान यांनी अजूनपर्यंत राजीनाम्याबाबत मीडियाशी संवाद साधलेला नाही. त्यांनी सोशल मीडियात एका निवेदनाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोमवारी ते संसदेत दाखल झाले. आवारात आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश त्यांच्यापर्यंत पोहोचले.
सहानुभूती व्यक्त करताना जयराम रमेश यांनी प्रधानांना उद्देशून 'असे होत असते,' असे म्हटले. त्यावर प्रधानांनीही लगेच जोरदार प्रत्युत्तर दिले. 'काहीच झालेले नाही. मी रस्त्यावरील लढवय्या आहे, वातानुकूलित खोलीतील कार्यकर्ता नाही, अशा शब्दांत प्रधान यांनी जयराम रमेश यांना उत्तर दिले.
प्रधानांचे जोरदार स्वागत
नीट पेपरफुटी प्रकरणावरून तापलेल्या वातावरणामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातील एनडीएच्या नेत्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. त्यांची पाठराखण करताना त्यांच्या कार्यकाळात शिक्षण व्यवस्थेत झालेल्या बदलांबाबत या नेत्यांकडून सोशल मीडियात लिहिण्यात आले होते. प्रधान हे सोमवारी पहिल्यांदाच संसदेत आल्यानंतर खासदारांनी जोरदार घोषणा देत त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, भाजप किंवा मोदी सरकारकडून प्रधान यांच्यावर कोणती नवी जबाबदारी सोपविली जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. प्रधान यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक किंवा निवडणूक कामांमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते. आगामी काळात उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकांमध्ये त्यांना महत्वाची भूमिका बजावावी लागू शकते, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.