Karnataka News: प्रसिद्ध यू-ट्यूबर आणि राजकीय विश्लेषक ध्रुव राठी हा सातत्यानं केंद्रातील सरकार, मोदी-शाह यांच्यावर नेहमीच सडकून टीका करतानाच त्यांना डिवचतानाही दिसून येतो. मात्र, धुव्र राठी 8 ऑक्टोबर 2026 रोजी बंगळुरू येथील फ्रीडम पार्कमध्ये 'कॉक्रोच जनता पार्टी'तर्फे एसआयआर प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली होती. त्याने याच आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावरुनच आता राजकारण तापलं आहे.
धुव्र राठीच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे माजी आयपीएस अधिकारी व भाजप नेते भास्कर राव यांनी थेट गृहमंत्रालयालाच पत्र लिहिलं आहे. त्यांनी ध्रुव राठी याच्या नागरिकत्व, व्हिसा आणि इमिग्रेशन स्टेटसची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात थेट प्रसिद्ध यू-ट्यूबर आणि राजकीय विश्लेषक ध्रुव राठीच्या नागरिकत्व व व्हिसाबाबतची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. परदेशी नागरिकांना किंवा अनिवासी भारतीय व्यक्तींना भारतातील राजकीय आंदोलनांमध्ये सहभाग घेण्याची परवानगी आहे का,असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच ध्रुव राठीकडे जर्मन नागरिकत्व आहे.त्याच्या पासपोर्ट व्हिसाची कॅटेगरी,भारतात येण्याचा हेतू,राहण्याचा अधिकृत कालावधी आणि इमिग्रेशन कायद्याच्या पालन याविषयीची चौकशी करण्याची मागणीही माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी केली आहे.त्यामुळे ध्रुव राठीच्या पाठीमागं चौकशीचा ससेमिरा लागणार का याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
भाजप नेते भास्कर राव पत्रात म्हणतात,ध्रुव राठींचं भारताच्या निवडणूक प्रक्रियेशी संलग्न एका संघटित राजकीय निदर्शनात सहभागी होणं नियमांतर्गत आहे का अशी विचारणा केली आहे. ओसीआय कार्ड वा अन्य दर्जा आहे आणि भारताच्या निवडणूक प्रक्रियेशी संलग्न एका संघटित राजकीय निदर्शनात त्यांचे सामील होणे नियमांतर्गत आहे का असाही सवाल त्यांनी केला आहे.
ध्रुव राठी एसआयआरच्या विरोधात आयोजित निदर्शनात सहभाग घेतला होता. यावेळी त्याच्यासोबत अभिनेता प्रकाश राज व अभिजीत दिपके यांसह लोक उपस्थित होते. या निदर्शनात ध्रुव राठी याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपूर्ण देशाला त्रास सहन करावा लागत असल्याची टीका केली होती. तसेच यावेळी त्याने केंद्रीय निवडणूक आयोगावरही जोरदार हल्लाबोल केला होता. आय़ोगाच्या एसआयआर प्रक्रियेत झिरो ट्रान्सपरन्सी आणि झिरो उत्तरदायित्वचा आरोप केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.