Congress : काँग्रेसचे माजी खासदार आर. ध्रुवनारायण यांचे निधन

R Dhruvanarayana Death : चामराजनगर येथून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
R Dhruvanarayana
R Dhruvanarayana Sarkarnama
Published on
Updated on

R Dhruvanarayana Death : कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. ध्रुवनारायण यांचे आज ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

छातीत त्रास होत असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना ह्दयविकाराच्या झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. २००९-२०१९ दरम्यान ते चामराजनगर येथून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

म्हैसूर येथील दलितांचे नेते म्हणून ध्रुवनारायण यांची ओळख होती. माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचे ते निकटवर्तीय होते. आज पहाटे अचानक त्यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना त्यांच्या गाडीच्या चालकाने रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला.

R Dhruvanarayana
ED Raid : त्रास देण्याऐवजी आम्हाला गोळ्या घाला ; सायरा मुश्रीफ भडकल्या..

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ध्रुवनारायण यांच्या निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com