J P Nadda: सीजेपीच्या मागण्या मान्य करणाऱ्या नड्डांनी शब्द फिरवला का? राज्यसभेत म्हणाले, आंदोलकांना अटक करणं...

J P Nadda: संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान बुधवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांविरोधात पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज अन् कथित पॅलेट गनच्या वापराविरोधात राज्यसभेत आज जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
JP Nadda, Jitendra Singh, Saurav Das, Ashutosh Ranka
JP Nadda, Jitendra Singh, Saurav Das, Ashutosh Ranka
Published on
Updated on

J P Nadda: संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान बुधवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांविरोधात पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज अन् कथित पॅलेट गनच्या वापराविरोधात राज्यसभेत आज जोरदार चर्चा पाहायला मिळाली. विरोधकांच्यावतीनं विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी या कारवाईविरोधात सरकारला धारेवर धरलं त्यानंतर त्यांच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी उत्तर दिलं, पण त्यांच्या उत्तरामुळं मोठा गोंधळ वाढत गेला.

खरंतर सीजेपीच्या आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं कारण खुद्द नड्डांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन त्यांना दिलं होतं. पण आता नड्डा यांच्या राज्यसभेतील विधानामुळं त्यांनी आपला शब्द फिरवला का? असा प्रश्न सोशल मीडियातून युजर्सकडून विचारला जात आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांच्या अमानुष कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. तसंच कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली. खर्गे म्हणाले, ज्या लोकांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि आजही मुक्तपणे संचार करत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी. त्यांच्या मागणीला जोर देताना विरोधी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. इतर विरोधी नेत्यांनीही त्यांना साथ दिली, तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावर निवेदन देण्याची मागणी केली. तसंच कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली.

JP Nadda, Jitendra Singh, Saurav Das, Ashutosh Ranka
Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना दणका!...तर थेट निलंबन?; सोशल मीडियासाठीची नियमावली वाचा!

माझी ही विनंती आहे की ज्या लोकांनी विनापरवानगी तिथं गेले त्यांना शिक्षा व्हायला हवी. ते तिथं का गेले? ते कोण आहेत? त्यांना कोणी पाठवलं? याचे आदेश कोणी दिले? मी विचारतोय की ते कोण आहेत? त्यांना आंदोलस्थळी जाण्यास कोणी सांगितलं? कोणी त्यांना तसे आदेश दिले? अशा एकामागून एक प्रश्नांनी सरबत्ती यावेळी खर्गे यांनी केली.

नड्डांनी दिलं उत्तर

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांशी वाटाघाटी करणाऱ्या जे पी नड्डा यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईबाबत बोलताना म्हटलं की, पोलिसांना सार्वजनिक कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्यानुसार कारवाई करणं गरजेचं आहे. कायदा-सुव्यवस्था राखताना अशा प्रकारे कारवाई केली जाणं ही खूपच सामान्य बाब आहे. पोलिसांनी सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई केली. जो कोणी विद्यार्थी सक्रीय कार्यकर्ते असतात तेव्हा त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो.

JP Nadda, Jitendra Singh, Saurav Das, Ashutosh Ranka
Gulabrao Patil: 'वीज नसली तर शेतकऱ्यांनी कळ सोसावी; उद्योगाची अडचण झाली तर सरकारची अडचण होते' : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने संताप

माझे मित्र जॉन ब्रिटास यांनी म्हटलंय की, पोलिसांची आंदोलकांवर कारवाई करणं हे कायदा-सुव्यवस्थेची ही एक सामान्य बाब आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मी स्वतः एक विद्यार्थी कार्यकर्ता होतो, आणिबाणीच्या काळात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला अनेकदा वर्गातून अटक करण्यात आली होती. म्हणजेच कोणत्याही विद्यार्थी कार्यकर्त्याला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. ही सामान्य बाब आहे. विरोधकांवर हल्लाबोल करताना नड्डा म्हणाले की, ते या प्रकरणाला सनसनाटी प्रकरण बनवत आहेत"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com