Sting Operation : काँग्रेस मंत्र्यांवर गुप्त पाळत? मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ; केंद्रीय मंत्र्यालाही घेरले

Karnataka Politics : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना घेरण्यासाठी भाजपने खेळी खेळत थेट केंद्रीय मंत्र्यालाच मैदानात उतरवले आहे. त्यांनी केलेल्या आरोपांवर शिवकुमार यांनी जोरदार पलटवार करत आपल्या मंत्र्यांना इशारा दिला आहे.
Karnataka Politics; dk shivakumar And hd kumaraswamy
Karnataka Politics; dk shivakumar And hd kumaraswamySarkarnama
Published on: 
Updated on: 

Karnataka Political News : कर्नाटकात भाजपने सत्ताधारी काँग्रेसविरोधात मोर्चा उघडला आहे. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनाच मैदानात उतरवले असून, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर तोफ डागली जात आहे. दरम्यान, कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोपांवर शिवकुमार यांनी पलटवार केला आहे. तसेच आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सावधानतेचा सल्ला देत भाजपपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

शिवकुमार यांनी राज्य सरकारमधील प्रभावी मंत्र्यांना लक्ष्य करून खासगी संस्थांच्या माध्यमातून गुप्त कारवाया आणि ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यासाठी विरोधकांकडून पडद्यामागे प्रयत्न सुरू असल्याचा इशारा दिला आहे. तर, या इशाऱ्यानंतर केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी बुधवारी त्यांच्यावर पलटवार केला होता.

शिवकुमार यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, दोन स्वतंत्र पथकांकडून ‘स्टिंग ऑपरेशन’ केले जात असल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. खासगी पातळीवर हे ऑपरेशन सुरू असून, मंत्र्यांनी अत्यंत सावध राहावे, असा इशाराही त्यांनी दिल्याचे समजते.

Karnataka Politics; dk shivakumar And hd kumaraswamy
Karnataka Politics : मुख्यमंत्रिपद सोडलं, आता निवडणुकही लढवणार नाही...; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मंत्र्यांना शिवकुमार यांनी स्वतंत्रपणे सावध केले. ‘तुमच्या सर्वांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका आणि सावध राहा. खासगी स्टिंग ऑपरेशन सुरू आहे,’ असे त्यांनी बैठकीत सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कुमारस्वामींचा पलटवार

दरम्यान, शिवकुमार यांच्या या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना कुमारस्वामी यांनी त्यांच्यावरच गंभीर आरोप केले. ‘शिवकुमार यांनीच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात स्टिंग ऑपरेशन करून मुख्यमंत्रिपद मिळविले,’ अशी चर्चा काँग्रेसमधील काही नेतेच करत असल्याचा दावा त्यांनी केला.

शिवकुमार आता आपली जुनी पद्धत पुन्हा सुरू करून त्याच तंत्राचा वापर आपल्या मंत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करत असल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला. त्यामुळे ‘स्टिंग ऑपरेशन’ च्या मुद्द्यावरून सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

Karnataka Politics; dk shivakumar And hd kumaraswamy
Karnataka Politics: कर्नाटकात 'डीकेएस'पर्व; 'सिध्दा'ही रिंगणात राहणार; काँग्रेसचे 'दक्षिणापथ', '२०२९'चाही बिगुल

मात्र, विरोधकांकडून नेमके कोणते पथक किंवा कोणती खासगी संस्था हे ऑपरेशन करत आहे, तसेच त्यामागील उद्देश काय आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांकडून किंवा सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण या इशाऱ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून, भाजप-काँग्रेस आमने-सामने आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com