Mamata Banerjee news : बंगालच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप; ममता बॅनर्जींच्या हातून पक्ष जाणार? बडतर्फ आमदारानेच घातला घाव

TMC rebellion, Ritabrata Banerjee news : बंडखोर आमदारांनी उघडपणे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात पवित्रा घेतला आहे. ममतांच्या बाजूने केवळ २० च्या जवळपास आमदार असल्याचे सांगितले जात आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

West Bengal politics : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभराच्या आतच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून ५० हून अधिक आमदार पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उभे ठाकल्याचे सध्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे बडतर्फ आमदारांच्या मागे हे आमदार उभे राहिले आहेत.

तृणमूल काँग्रेस पक्षाने ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा या दोन आमदारांना पक्षातून दोन दिवसांपूर्वीच बडतर्फ केले आहे. आता या दोन आमदारांनीच ममतांना जोरदार धक्का दिला आहे. तृणमूलचे ८० आमदार असून त्यापैकी दोन तृतियांशहून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा ऋतब्रता बॅनर्जी यांनी केला आहे. सुमारे ५९ आमदारांचे पत्र घेऊन ते विधानभवनात दाखल झाले आहेत.

ऋतब्रता बॅनर्जी यांच्याकडून या आमदारांचे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिले जाणार असून ते विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार आहेत. दुसरीकडे पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी कालच विधानसभा अध्यक्षांना पक्ष लिहून शोभनदेव चटोपाध्याय यांचीच विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. पक्षाने निवडणुकीनंतरच्या पहिल्याच आठवड्यातही तसे पत्र दिले होते.

Mamata Banerjee
सुपरकॉप ते भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा; पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत?

यापार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. ऋतब्रता बॅनर्जी यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या गटाला मान्यता दिली जाणार की, चटोपाध्याय यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, यावर तृणमूल काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असणार आहे. बंडखोर गटाला मान्यता मिळाल्यास ममता बॅनर्जी यांच्यासाठी आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीतील सर्वात मोठा धक्का असेल.

Mamata Banerjee
Cockroach Janata Party news : कॉक्रोच जनता पार्टीचा सरकारने घेतलाय धसका; महाराष्ट्र पोलिसांची एक कृती अन् केंद्रीय मंत्र्यांची पोस्ट चर्चेत

बंडखोर आमदारांनी उघडपणे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात पवित्रा घेतला आहे. ममतांच्या बाजूने केवळ २० च्या जवळपास आमदार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाचे अनेक खासदारही बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बंडखोर गटाकडून पक्ष आणि पक्षाचे चिन्हही ताब्यात घेण्याची तयारी केली जाणार असल्याचे जोरदार चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com