Iran War update : इराण युध्दाबाबत ट्रम्प यांची मोठी घोषणा; संपूर्ण जगाला दिलासा, काही तासांपूर्वीच दिली होती धमकी...

Iran energy infrastructure strike pause : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टीमेटमनंतर इराणने आखातातील देशांमधील ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करण्याचे आव्हान दिले होते. तसेच होर्मुज सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा इशाराही दिला होता.
US Iran conflict news
US Iran conflict newsSarkarnama
Published on
Updated on

US Iran conflict news : इराण युध्द आणखी चिघळण्याची भीती असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी मोठा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी शनिवारी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. पण ही मुदत संपण्याआधीच त्यांनी एक पाऊल मागे घेत हल्ला न करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

इस्त्रायल आणि अमेरिकेकडून मागील काही दिवसांपासून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. प्रामुख्याने इराणच्या सुरक्षा यंत्रणांना टार्गेट केले जात आहे. इराणकडूनही इस्त्रायलसह अनेक आखाती देशांवर हल्ले करण्यात आले. त्यामुळे हा संघर्ष अधिकच पेटला. इराण मागार घेत नसल्याने ट्रम्प यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.

ट्रम्प यांनी इराणला होर्मुज सामुद्रधुनी सर्व मालवाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी खुली करण्यासाठी शनिवारी ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. इराणच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ला करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. पण ही मुदत संपण्याआधीच त्यांनी सोमवारी एक पाऊल मागे घेतले. मात्र, ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे जगाची चिंता वाढली होती. अमेरिकेने हल्ला केला असता तर युध्दाचा प्रचंड भडका उडाला असता. तसेच जगासमोर ऊर्जा संकट उभे ठाकले असते, अशी भीती व्यक्त केली जात होती.

US Iran conflict news
Raj Thackeray news : भोंदूबाबा खरात प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, माझ्या तर कानावर असं येतंय की, कोणाच्या तरी...

ट्रम्प यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, इराणसोबत मागील दोन दिवसांपासून सकारात्मक चर्चा सुरू आहे. पुढील आठवडाभर ही चर्चा सुरू राहणार आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढणे, हा चर्चेचा हेतू आहे. दोन्ही देशांमधील ही सकारात्मक चर्चा पुढील आठवडाभर सुरू राहील. या पार्श्वभूमीवर मी अमेरिकी संरक्षण विभागाला निर्देश दिले आहेत की, इराणच्या ऊर्जा प्रकल्प आणि ऊर्जा सुविधांवरील सर्व सैन्य हल्ले पुढील पाच दिवस करू नयेत.

US Iran conflict news
EPFO चं मोठं पाऊल, 5200 कोटी थेट खातेदारांच्या बँक खात्यात जमा होणार

दरम्यान, ट्रम्प यांच्या अल्टीमेटमनंतर इराणने आखातातील देशांमधील ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करण्याचे आव्हान दिले होते. तसेच होर्मुज सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा इशाराही दिला होता. आता ट्रम्प यांनी चर्चा सुरू असल्याचे सांगत जगाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या युध्दाबाबत भारतासह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com