Donald Trump : इराणच्या हत्येच्या धमकीनंतर ट्रम्प घाबरले? चक्क केटरिंग ट्रकमध्ये लपूनछपून केला प्रवास, 'तो' व्हिडिओ आला समोर

Iran Threat Trump Secret Flight : अंकारा विमानतळावर ट्रम्प नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर जुन्या एअर फोर्स वन विमानात चढले. त्यामुळे ट्रम्प याच विमानातून ब्रिटनला रवाना झाल्याचे सर्वांना वाटले. मात्र, विमानात चढल्यानंतर काही वेळातच त्यांना गुप्तपणे बाहेर काढण्यात आले.
Trump Secret Flight | Iran Threat | C-32A
US President Donald Trump reportedly made a covert flight change in Turkey amid an alleged Iran security threat, traveling on a C-32A military aircraft.Sarkarnama
Published on
Updated on

Donald Trump Secret Flight : इराणकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षेसाठी चक्क गुप्तपणे विमान बदलून तुर्कीहून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प जुन्या एअर फोर्स वन विमानातूनच प्रवास करत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता.

प्रत्यक्षात मात्र त्यांना विमानातून उतरवून एका केटरिंग ट्रकमधून दुसऱ्या विमानापर्यंत नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी छोट्या C-32A लष्करी विमानातून ब्रिटन गाठले. द वॉशिंग्टन पोस्टने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. ट्रम्प मागील महिन्यात नाटो शिखर परिषदेसाठी तुर्कीची राजधानी अंकारा येथे गेले होते. कतारकडून अमेरिकेला देण्यात आलेल्या आणि नुकतेच नूतनीकरण केलेल्या नव्या विमानातून त्यांचा हा प्रवास झाला होता.

मात्र, अंकाराहून परतताना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना त्या विमानातून प्रवास न करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंकारा विमानतळावर ट्रम्प नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर जुन्या एअर फोर्स वन विमानात चढले. त्यामुळे ट्रम्प याच विमानातून ब्रिटनला रवाना झाल्याचे सर्वांना वाटले. मात्र, विमानात चढल्यानंतर काही वेळातच त्यांना गुप्तपणे बाहेर काढण्यात आले. त्यांना एका केटरिंग ट्रकमध्ये बसवण्यात आले आणि हा ट्रक विमानतळावरील दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला.

Trump Secret Flight | Iran Threat | C-32A
Excise Bribe Case : मद्य परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी 22 लाखांची लाच; उत्पादन शुल्क निरीक्षकाला अटक

यानंतर ट्रम्प C-32A या छोट्या लष्करी विमानात बसले आणि त्यातून ब्रिटनकडे रवाना झाले. दरम्यान, माध्यम प्रतिनिधी आणि इतर प्रवासी जुन्या एअर फोर्स वन विमानातच राहिले. त्यामुळे ट्रम्प नेमके कोणत्या विमानातून प्रवास करत आहेत, याची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, C-32A विमान ब्रिटनमध्ये जुन्या एअर फोर्स वन विमानाच्या काही मिनिटे आधी पोहोचले. त्यानंतर ट्रम्प पुन्हा आपल्या अधिकृत ताफ्यात सामील झाले.

Trump Secret Flight | Iran Threat | C-32A
BJP Leader Viral Video : भाजप नेत्याचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल; हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा कट उघड; राजकीय वर्तुळात खळबळ

या गुप्त ऑपरेशनमागे इराणकडून ट्रम्प यांच्या जीवाला असलेला धोका असल्याचे समोर आले आहे. इराणच्या प्रॉक्सी गटांकडून ट्रम्प यांच्या विमानाला लक्ष्य करण्याचा धोका असल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी विमान बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकन प्रशासनाने अत्यंत गुप्त पद्धतीने हा संपूर्ण विमान बदलाचा प्लॅन आखला होता. प्रसारमाध्यमांपासूनही त्यांची खरी हालचाल लपवण्यात आली होती. त्यामुळे इराणकडून मिळालेल्या धमकीचे गांभीर्य आणि ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने घेतलेल्या अभूतपूर्व खबरदारीची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com