

US Pakistan India diplomacy : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तामध्ये मोठा संघर्ष झाला होता. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. आपल्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांतील संघर्ष थांबल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार करत आहेत. एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगले मित्र म्हणतानाच ते पाकिस्तानलाही चुचकारत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत याबाबत मोठे विधान केले आहे.
वॉशिंग्टन येथे आयोजित ‘बोर्ड ऑफ पीस’च्या उद्घाटनावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफही उपस्थित होते. यादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ जगभरात व्हायरल होत आहे. ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्याचे श्रेय पुन्हा घेतले.
दोन्ही देशांवरील संघर्षावर बोलत असतानाच टॅम्प यांनी मागे खुर्चीवर बसलेल्या शहबाज शरीफ यांना उभे राहण्यास सांगितले. शरीफही उभे राहिले आणि त्यांनी ट्रम्प यांच्याकडे पाहून हात जोडले. हे घडत असतानाच ट्रम्प म्हणत होते की, पाकिस्तान आणि भारत, खूप आभारी आहे. मी पंतप्रधान मोदींशी बोललो. ते खूप उत्सुक होते. ते आता आपल्याला पाहत आहेत. ते खूप महान व्यक्त आहेत आणि माझे खूप चांगले मित्रही आहेत.
‘बोर्ड ऑफ पीस’मधील हा व्हिडीओ जगभरात वेगाने व्हायरल होत आहे. त्यावरून आता चर्चांना उधाण आले आहे. ही घटना जगभरातील मोठ्या नेत्यांसमोर पाकिस्तनसाठी मान खाली घालायला लावणारी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. एकीकडे अमेरिकेसोबत आपले संबंध मजूबत करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असतानाच ट्रम्प यांच्याकडून वारंवार भारताला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानातील संघर्ष थांबविण्याचे श्रेय घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. टॅम्प म्हणाले, दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे आणि विमाने पाडली जात असल्याचे समजल्यानंतर मी एक फोन केला. युध्द थांबविले नाही तर मी दोन्ही देशांवर २०० टक्के टेरिफ लावेन, असे त्यांना सांगितले.
ट्रम्प यांनी अनेकदा हा दावा केला. भारताने यापूर्वीच हे दावे खोडून काढले आहे. दोन्ही देशांतील संघर्ष थांबण्यामागे कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. पण त्यानंतरही ट्रम्प वारंवार हा मुद्दा उकरून काढत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.