DY Chandrachud news : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर महत्वाची जबाबदारी; रशियाच्या बाजूने लढणार

D Y Chandrachud, former Chief Justice of India : यूक्रेनच्या ओशचाड बँकेचा रशियाविरोधात गुंतवणूक करारावरील वाद; डोनेत्स्क, लुहांस्कसह युद्धग्रस्त भागातील कथित नुकसानीवर चंद्रचूड यांची निर्णायक भूमिका.
CJI DY Chandrachud
CJI DY ChandrachudSarkarnama
Published on
Updated on

Russia Ukraine dispute : भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची आता एक आंतरराष्ट्रीय प्रकरणाची महत्वपूर्ण जबाबदारी आली आहे. भारताचा मित्रदेश असलेल्या रशियाने चंद्रचूड यांच्यावर विश्वास दाखवत यूक्रेनशी असलेल्या एका वादामध्ये मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आहे. यूक्रेनच्या ओशचाड या सरकारी बँकेने रशियाविरोधात दाखल केलेल्या गुंतवणूकीशी संबंधित वादामध्ये चंद्रचूड यांची मध्यस्थाची महत्वाची भूमिका असणार आहे.

यूक्रेनच्या बँकेने रशियाविरोधात काही हजार कोटींचा दावा दाखल केला आहे. रशियासाठी हा आंतरराष्ट्रीय वाद महत्वाचा असून त्यासाठी भारताच्या माजी सरन्यायाधीशांची निवड करण्यात आल्याने त्यालाही महत्व प्राप्त झाले आहे. ग्लोबल आर्बिट्रेशन रिव्ह्यूच्या रिपोर्टच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. रशिया आणि यूक्रेनमदील हा वाद १९९८ मधील गुतंवणुकीशी संबंधित कराराबाबत आहे.

यूकेनमधील डोनेत्स्क, लुहांस्क, खेरसॉन आणि जापोरिज्जिया या भागातील मालमत्ता आणि उद्योग क्षेत्रालाच्या कथित नुकसानाबाबत हा वाद सुरू आहे. २०२२ मध्ये रशियाच्या लष्करी कारवाईदरम्यान या मालमत्ता आणि उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा बँकेने केला आहे. या प्रकरणाची सुनावणी तीन सदस्यीय लवाद करणार आहे.

CJI DY Chandrachud
Parliament Monsoon Session : विरोधकांना सरकारची भीती; आठवली 2023 मधील अभूतपूर्व घडामोड, अखेरच्या चार दिवस धडधड वाढविणारे...

कोस्टा रिकाच्या माजी उद्योग मंत्री डायाला जिमेनेज यांना रशिया आणि बँकेने लवादाच्या अध्यक्ष म्हणून संयुक्तपणे नेमले आहे. तर बँकेकडून त्यांची बाजू मांडण्यासाठी नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे प्रोफेसर स्टावरोस ब्रेकॉलाकिस आणि रशियाने माजी CJI धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, रशियाकडून चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्याचा हा पहिला प्रस्ताव नव्हता.

CJI DY Chandrachud
Delimitation Bill : मोदी सरकारची शेवटची आशाही मावळली; आता विरोधकांचं ऐकण्याशिवाय पर्यायच नाही?

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यापूर्वी रशियाचे काही प्रकरणांशी संबंधित प्रस्ताव धुडकावून लावले होते. मात्र, आता यूक्रेनच्या बँकेशी संबंधित केसमध्ये त्यांनी होकार दर्शविल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यानुसार रशियाकडून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रकरणामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com