Ed Action : ईडीची मोठी कारवाई : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला ठोकले टाळे

नॅशनल हेराल्ड (National Herald) कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे.
National Herald house|
National Herald house| sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड (National Herald) कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने (ED) नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला टाळे ठोकले. परवानगीशिवाय कार्यालय खोलू नये असे निर्देश ईडीने दिले आहेत.

याआधी या प्रकरणात ईडीकडून काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) तसेच काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीमुळे देशभरात मोदी सरकार तसेच ईडीविरोधात निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयाला टाळे ठोकले.

National Herald house|
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राहुल गांधीनी बदललेल्या डीपी'ची चर्चा | Rahul Gandhi news

नॅशनल हेराल्ड कथित गैरव्यहारप्रकरणी ईडीने दिल्लीतील कार्यालयाला टाळे ठोकले आहे. परवानगीशिवाय हा परिसर खुला करु नये, असे निर्देश ईडीने दिले आहे. ईडीने मंगळवारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकून तपास केला होता. त्यानंतर आता या कार्यालयाला टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली.

National Herald house|
बंड थंड करण्याची ताकद माझ्यात आहे; ठाकरेंचा इशारा

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणात ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. त्या विरोधात काँग्रेसने राजधानी दिल्लीसह देशभर आंदोलने केली होती. ईडीने राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते पवन बन्सल आणि मल्लिकार्जुन खरगे यांचीदेखील चौकशी केली. जून महिन्यात पाच दिवस राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने त्यांची जवळपास ५० तास चौकशी केलेली. त्यानंतर सोनिया गांधी यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com