

Private school approval scam : देशभरात अनेक प्रवेश परीक्षा, भरती परीक्षा, शिक्षक नियुक्त्यांचे घोटाळे समोर येत असतानाच आता शिक्षण विभागातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी शिक्षणमंत्र्यांसह एका आमदाराकडूनच खासगी शाळांना मान्यतेसह त्यांच्या इतर कामांसाठी १०० कोटींची वसुली केल्याचे उघड झाले आहे. कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दोघेही पोलिसांना शरण आले आहेत.
तमिळनाडूचे माजी शिक्षण मंत्री अनबिल महेश पोय्यामोझी यांना गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. चेन्नई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानतंर ते पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर आता माजी आमदार मुथूकुमार हे गुरूवारी पोलिसांना शरण आले आहे. चेन्नईतील विशेष न्यायालयात ते गुरूवारी हजर झाले.
राज्यात २०२१ ते २०२६ या काळात डीएमकेची सत्ता असताना आरोपींनी अनेक शाळांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहेत. तेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहेत. मुथूकुमार हे खासगी शाळा संघटनेत खजीनदार होते. त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. टी. अरसाकुमार यांच्या मदतीने पक्षाला मदतनिधीच्या नावाखाली शंभर कोटी रुपये वसूल केल्याचे तपासात उघड झाले आहे.
शाळांना मान्यतेसह विविध सरकारी परवानग्यांसाठी शाळा व्यवस्थापनाला अमिष दाखविले जात होते. याप्रकरणी ग्रेटर चेन्नई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह सक्तवसुली संचालनालयानेही गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे माजी मंत्र्यांसह माजी आमदाराच्या अडचणी वाढल्या आहेत.
मंत्री असताना महेश यांनी जवळपास एक हजार खासगी शाळांकडून विविध कामांसाठी लाच घेतल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर विजय यांनी मागील सरकारच्या काळातील भ्रष्टाचार प्रकरणांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी भ्रष्टाचारप्रकरणी तातडीने कारवाई निर्देश पोलिसांना दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.