Amit Shah Pune Visit : शिंंदे-पवारांनी घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Ajit Pawar visit Amit Shah : एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिघांची भेट झाली.
Ajit Pawar visit Amit Shah :
Ajit Pawar visit Amit Shah :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राजकीय घडामोडींसह केंद्र आणि राज्य सरकारसंबंधित विविध विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक आयोगातील लढाई, शिवसेना आमदारांवर अपात्रतेची कारवाई, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावरही शिंदे, पवारांनी शहा यांच्यापुढे भूमिका मांडल्याचे कळते

Ajit Pawar visit Amit Shah :
Prithviraj Chavan: अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर? पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांनाच बोलते केले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शाह यांच्यासह शिंदे - पवार पुण्यात आहेत. त्याचवेळी शिंदे-पवार यांनीही देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिघांची भेट झाली. (Eknath Shinde Ajit Pawar will meet Amit Shah)

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रसचे दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकामधील समावेशानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गटात संघर्ष सुरू झाले आहे.

Ajit Pawar visit Amit Shah :
Dhairyashil Kadam Vs Balasaheb Patil : बाळासाहेब पाटील शरद पवार की अजित पवारांकडे ; धैर्यशील कदमांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या गटावर कारवाई सुरू आहे. तर दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. ही लढाई आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात पोचले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर अजित पवार - अमित शाह यांच्या भेटीकडे राजकीय अर्थांनी पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.