

Election Commission controversy : मुख्य निवडणूक आयुक्तांवर विरोधी पक्षांकडून वोट चोरीचे गंभीर आरोप केले जात असतानाच आता तृणमूल काँग्रेसकडून मोठा धमाका केला जाण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबतच्या बैठकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग उघड करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.
देशात सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या पडताळणी मोहिमेवरून (SIR) रान उठले आहे. या प्रक्रियेनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा दारूण पराभव झाला होता. पक्षाने या प्रक्रियेवरच पराभवाचे खापर फोडले आहे. निवडणुकीआधी पक्षाच्या शिष्टमंडळाने ज्ञानेश कुमार यांची भेट घेत चर्चा केली होती.
ज्ञानेश कुमार यांच्यासोबत झालेल्या या बैठकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग जगासमोर आणण्याबाबत पक्ष विचार करत असल्याचे वृ्त्त 'टाईम्स नाऊ'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पक्षाकडून पुढील आठवड्यात हे रेकॉर्डिंग व्हायरल केले जाऊ शकते. निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत कसा संवाद साधते, हे दाखविण्याचा त्यामागे उद्देश असेल, असे वृत्तात म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांमधील मतभेदाची जोरदार चर्चा होत आहे. दोन आयुक्तांनी नोंदविलेल्या १४ आक्षेपांनंतर विरोधकांच्या आरोपांना धार आली आहे. SIR बाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापार्श्वभूमीवर आयोगासोबच्या बैठकीचे रेकॉर्डिंग समोर आणले जाऊ शकते, असे सुत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मागील आठवड्यातच ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच पश्चिम बंगाल, बिहारसह अन्य राज्यांमध्ये पुन्हा निवडणूक घेण्यावरही त्यांनी जोर दिला आहे. त्या स्वत: निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. तसेच पक्षाच्या दारुण पराभवानंतर २० खासदार आणि ६० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.