महापालिका निवडणुकीमुळे मुख्यमंत्री अडचणीत! निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश

महापालिकेच्या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री आता अडचणीत आले आहेत.
Narendra Modi and Himanta Biswa Sarma
Narendra Modi and Himanta Biswa SarmaSarkarnama

गुवाहाटी : आसाममध्ये (Assam) मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) बाजी मारली होती. भाजपने पुन्हा एकदा सत्ता मिळवली तरी मुख्यमंत्री मात्र, बदलला होता. सर्वानंद सोनोवाल यांच्या जागी हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांना मुख्यमंत्रिपदी नेमण्यात आलं होतं. नुकत्याच झालेल्या गुवाहाटी महापालिकेच्या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री सरमा हे आता अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी असोम जातीय परिषद या पक्षाने तक्रार केली आहे. सरमा यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावर निवडणूक आयोगाने कामरूपच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत आयोगाने म्हटले आहे की, असोम जातीय परिषदेच्या संजीव बोरा यांनी दिलेली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. त्यांना या प्रकरणी चौकशी करून लवकरात लवकर आयोगाकडे अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Narendra Modi and Himanta Biswa Sarma
मंडलिक, कुपेकरांना उतारवयात कुणी त्रास दिला? समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर निशाणा

गुवाहाटी महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री सरमा यांनी मतदारांनी प्रलोभन दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डमधील एक हजारहून अधिक मतदारांना अरूणोदय योजनेचे लाभार्थी बनवण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. या योजनेअंतर्गत कुटुंबांना आर्थिक मदत केली जाते. याचबरोबर भाजप सत्तेत आल्यास प्रत्येक वॉर्डला 10 कोटी रुपयांचा विकासनिधी देण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. हे वक्तव्य अखेर मुख्यमंत्र्यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.

Narendra Modi and Himanta Biswa Sarma
बारा आमदारांचं काय होणार? राज्यपालांनी पाठवलेलं ते पत्रच निघालं बनावट

आसाममध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात भाजपने बहुमत मिळवून दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली होती. माजी मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल आणि हिमंता बिस्वा सर्मा यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजप संघटन महासचिव बी. एल. संतोष यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये आसामच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली होती. नंतर भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत हिमंता बिस्वा सरमा यांचे नाव निश्चित करण्यात आले होते तर सर्वानंद सोनोवाल यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com