Casting Couch in Congress : मी त्यांना खूष करू शकले नाही! काँग्रेसमध्ये 'कास्टिंग काऊच’, महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

Simmi Rosebell John Kerala Congress : सिमी रोझबेल जॉन यांच्याविरोधात केरळ महिल काँग्रेसने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Simmi Rosebell John
Simmi Rosebell JohnSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मल्याळम चित्रपटसृष्टीत लैंगिक छळाचे आरोप होत असताना राजकारणातील कास्टिंक काऊचनेही डोके वर काढले आहे. काँग्रेसच्या महिला नेत्याने याबाबत गंभीर आरोप केले आहेत. राजकारणात पक्ष नेतृत्वाच्या जवळ असलेल्यांनाच संधी मिळत असल्याचा आरोप या महिला नेत्याने केला आहे.

केरळ काँग्रेसमधील नेत्या सिमी रोझबेल जॉन यांनी हे आरोप केले आहेत. त्यांमुळे राज्यातील काँगेसमध्ये खळबळ उडाली आहे. जॉन यांच्या या आरोपांनंतर केरळ महिला काँग्रेसने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांनी थेट विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतिशन यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत.

Simmi Rosebell John
Tejashwi Yadav : ... ते तर योगींचे चायनीज व्हर्जन! तेजस्वी यादवांच्या टीकेवर भाजप नेते भडकले...

मी त्यांच्या गुड बुकमध्ये जाऊ शकले नाही, कारण मी त्यांना खूश करू शकले नाही, असा गंभीर आरोप जॉन यांनी केला आहे. चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊचची तुलना जॉन यांनी केरळ काँग्रेसमधील परिस्थितीशी केली आहे. मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या, नकारात्मक अनुभव आलेल्या अनेकांनी मला ते अनुभव सांगितले आहेत. त्याचे पुरावेही माझ्याकडून असून योग्यवेळी जगजाहीर करेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जॉन यांनी केरळ महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार जेबी माथेर यांचे नाव घेत अशा लोकांना काँग्रेसमध्ये सन्मान मिळतो, असा दावा केला आहे. युवक काँग्रेसच्या सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तसेच आठ वर्षांपूर्वी महिला काँग्रेसमध्ये आल्यानंतर ते शांत बसले.

केरळ काँग्रेसमधील किती महिलांना समस्यांना तोंड द्यावे लागले, असा सवालही जॉन यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी आदेशाचे पालन केले नाही त्यांना चांगली वागणूक मिळत नाही तर इतरांना पक्ष नेतृत्वाकडून सन्मान मिळतो, असा दावा जॉन यांनी केला आहे.

Simmi Rosebell John
Ripun Bora : ममतांना मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांचा पाठिंबा असताना सतिशन यांनी आपला संधी नाकारली. मी पक्षासाठी जेवढे काम केले त्याचीशी सतीशन यांनी केलेल्या कामासोबत तुलनाही होऊ शकत नाही, असे जॉन यांनी म्हटले आहे. त्यांनी इतर काही महिलांना दिलेल्या पदांवर आक्षेप घेत सतिशन यांच्यावर आरोप केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com