Tamilnadu Alliance: महाविकास आघाडीच्या पावलावर पाऊल! काँग्रेसनं तामिळनाडूत केली नव्या आघाडीची घोषणा

Tamilnadu Alliance: महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांची मिळून महाविकास आघाडी कार्यरत आहे. २०१९ मध्ये सत्ता स्थापन करताना ही आघाडी तयार झाली होती. अशी नवी आघाडी तामिळनाडूत स्थापन झाली आहे.
Secular Social Justice Victory Alliance (SSJVA)
Secular Social Justice Victory Alliance (SSJVA)
Published on
Updated on

Tamilnadu Alliance: महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांची मिळून महाविकास आघाडी कार्यरत आहे. २०१९ मध्ये सत्ता स्थापन करताना ही आघाडी तयार झाली होती. अशी नवी आघाडी तामिळनाडूत स्थापन झाली आहे. या आघाडीला नुकतंच नवं नाव देण्यात आलं. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

तामिळनाडूत काँग्रेस सध्या जोसेफ विजय यांच्या टीव्हीके या सर्वात मोठ्या पक्षासोबत सत्तेत आहे. टीव्हीचे सर्वोसर्वा जोसेफ विजय हे सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. टीव्हीके विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसनं त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि सत्ता काबीज केली. त्यानंतर इतर छोटे पक्षही या आघाडीत सामिल झाली. पण ही निवडणूक होऊन आता ४ महिने झाले तरी सत्तेत असलेल्या या आघाडीला नाव देण्यात आलं नव्हतं. पण आता या आघाडीला नवं नाव देण्यात आलं आहे. 'सेक्युलर सोशल जस्टिस व्हिक्टरी अलायन्स' (SSJVA) असं या आघाडीचं नाव असणार आहे. टीव्हीकेच्या चेन्नईतील मुख्यालयात याबाबतची बैठक पार पडली.

Secular Social Justice Victory Alliance (SSJVA)
Riya Ahir: जेनझी आंदोलनात मुंबई पोलिसांची गाडी अडवणारी 'रिया अहिर' पुन्हा चर्चेत; भाजपच्या माजी प्रवक्त्यानं राहुल गांधींवरुन डिवचलं

आघाडीत कोणते पक्ष?

'सेक्युलर सोशल जस्टिस व्हिक्टरी अलायन्स' या आघाडीत तमिळगा वेत्री कळघम (TVK) - (मुख्य सत्ताधारी पक्ष ज्याचे नेते सी. जोसेफ विजय मुख्यमंत्री आहेत), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), विदुथलाई चिरुथाईगल कची (VCK), इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), मरुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK) या पाच पक्षांचा समावेश आहे. आज टीव्हीकेचे प्रमुख तथा मुख्यंमत्री जोसेफ विजय यांच्यासह इतर चारही पक्षाचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत आघाडीचं नामकरण पार पडलं. या पाच पक्षांव्यतिरिक्त सीपीआय (एम) आणि सीपीआय या दोन्ही डाव्या पक्षांनी देखील सरकारला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला आहे. पण त्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते.

Secular Social Justice Victory Alliance (SSJVA)
CJI Furious: सरन्यायाधीश प्रचंड संतापले! म्हणाले, "तुमची हिंमत कशी झाली?" CJPच्या आंदोलकांविरोधात कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला झापलं

दीर्घकाळ आघाडीत राहणार

तामिळनाडूत चार महिन्यांपूर्वी सत्ता स्थापन झाली असली तरी आता पुढील साडेचार वर्षे ही आघाडी सत्तेत असणार आहे. या काळात त्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी किमान समान कार्यक्रमही आखला जाईल. यासाठी त्यांना आघाडीच्या नावानं गोष्टी कराव्या लागतील, हे सोप्प व्हावं यासाठी या आघाडीला नवं नाव देण्यात आलं आहे. त्याचबरोबर हीच आघाडी भविष्यातही कायम राहणार असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com