Riya Ahir: जेनझी आंदोलनात मुंबई पोलिसांची गाडी अडवणारी 'रिया अहिर' पुन्हा चर्चेत; भाजपच्या माजी प्रवक्त्यानं राहुल गांधींवरुन डिवचलं

Riya Ahir: मुंबईतील जेनझींच्या आंदोलनात पोलिसांची गाडी अडवून धरणारी रिया अहिर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Riya Ahir_Shehzad Poonawala_Rahul Gandhi
Riya Ahir_Shehzad Poonawala_Rahul Gandhi
Published on
Updated on

Riya Ahir: मुंबईतील जेनझींच्या आंदोलनात पोलिसांची गाडी अडवून धरणारी रिया अहिर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्यामध्ये आणि रियामध्ये 'तू तू मै मै' पाहायला मिळालं आहे. बिग बॉस २० च्या प्रवेशावरुन या नेत्यानं तिला आधी डिवचलं, त्यानंतर तिनं या नेत्यावर शाब्दिक हल्ला चढवला. त्यानंतर पुन्हा या नेत्यानं रिया अहिरला राहुल गांधी यांच्यावर डिवचलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईस्थित मॉडेल असलेल्या रिया अहिर हिला टेलिव्हिजन शो बिग बॉसच्या २० व्या सिझनमध्ये प्रवेश मिळू शकला नाही. यावरुन भाजपचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते राहिलेले आणि नुकतेच पक्षातून बाहेर पडलेले शहजाद पुनावाला यांनी रियावर आपल्या एका रीलच्या माध्यमातून टीका केली होती. त्याचबरोबर पत्रकार अरफा खानूम शेरवानी यांच्यावरही टीका केली आहे. मॉडेल रिया अहिर आणि पंजाबी अभिनेत्री लव्ह गिल या दोघांमध्ये बिगबॉसच्या घरात जाण्यासाठी चुरस होती. पण पब्लिक वोटिंगमध्ये गिलचा विजय झाला आणि अहिर पराभूत झाली. त्यामुळं तिला बिग बॉसच्या घरात प्रवेश करता आला नाही.

Riya Ahir_Shehzad Poonawala_Rahul Gandhi
CJI Furious: सरन्यायाधीश प्रचंड संतापले! म्हणाले, "तुमची हिंमत कशी झाली?" CJPच्या आंदोलकांविरोधात कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला झापलं

रियानं पुनावाला यांना दिलं प्रत्युत्तर

रिया अहिरनं देखील शेहजाद पुनावाला यांच्या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना म्हटलं की, "आदरणीय शहजाद पुनावाला अंकल तुम्ही माझ्यावर बनवलेलं रील मी नुकतंच पाहिलं. मी हे पाहून जाम खूश झाले. पण माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की, तुमचा हा मोठा आवाज माझ्या वैयक्तिक व्यवसायात आणि जीवनापासून दूर ठेवा ही माझी तुम्हाला विनंती आहे" तसंच २८ वर्षीय रिया अहिर हिनं ३८ वर्षीय पुनावाला यांच्यावर टीका करताना 'मुलींना कॉर्नर करण्याचा त्यांचा जुनाच धंदा' असल्याचा आरोप केला. तुम्ही महिलांना एकटं सोडा, असंही तिनं म्हटलं आहे.

रियाच्या वयावरून केलेल्या टीकेवर पुनावाला म्हणाले, "तुम्ही २८ वर्षांच्या आहात, त्यामुळं तुम्ही तरुण मुलं नाही आहात. मी सध्या ३८ वर्षांचा आहे, त्यामुळ तांत्रिकदृष्ट्या माझे वय तुमच्या वयाच्या दुप्पट नाही. शाळेत गणित हा तुमचा कधीच जमेचा विषय नव्हता हे यातून स्पष्टच होत आहे. रियाच्या प्रतिक्रियेकडं लक्ष देण्याची गरज नाही, उलट आरफा यांच्यासोबत आणखी एक पॉडकास्ट केल्यास त्यांना ते कदाचित फायदेशीर ठरेल" अशा शब्दांत पुनावाला यांनी रियाला डिवचलं.

Riya Ahir_Shehzad Poonawala_Rahul Gandhi
CJI Furious: सरन्यायाधीश प्रचंड संतापले! म्हणाले, "तुमची हिंमत कशी झाली?" CJPच्या आंदोलकांविरोधात कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला झापलं

याच घटनेवरुन शहजाद पुनावाला यांनी नुकतंच एक रील बनवलं यामध्ये रिया अहिर हीचा पोलिसांचा गाडी अडवतानाचा व्हायरल फोटो दाखवला आहे. यावरुन रियाचा बिगबॉसमध्ये जाण्यासाठी हा प्लॅन सेट होता, असा गंभीर आरोपही केला. पुनावाला यांनी म्हटलं की, "हा आंदोलनादरम्यानचा फोटो असून तो राहुल गांधी ते राज ठाकरे अशा अनेक नेत्यांनी आपल्या राजकीय व्यासपीठावरुन शेअर केला होता. रियाच्या या राजकीय अजेंड्याला बिगबॉसच्या घरात जायचं होतं. हा खरंतर मोदीविरोधी अजेंडा होता"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com