Congress News : काँग्रेसमध्ये गळती सुरूच, आता माजी केंद्रीय मंत्री करणार भाजपत प्रवेश

Congress Latest News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यानंतर यांनीही काँग्रेसचा हात सोडून भाजपत प्रवेश केला होता.
rahul gandhi narendra modi
rahul gandhi narendra modisarkarnama
Published on
Updated on

कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) घोषित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. पण, काँग्रेसमधील गळती थांबण्याचं नाव घेत नाही. आता माजी केंद्रीय मंत्री, मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश पचौरी भाजपत प्रवेश करणार ( Suresh Pachauri Join Bjp ) आहेत. त्यामुळे निवडणुकीच्यापूर्वी काँग्रेसच्या ( Congress ) अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

rahul gandhi narendra modi
Lok Sabha Election 2024 : पहिली नोकरी पक्की... युवकांसाठी ‘राहुल की गॅरंटी’; काँग्रेसच्या पाच मोठ्या घोषणा

चार वेळा खासदार राहिलेल्या सुरेश पचौरी ( Suresh Pachauri ) यांनी काँग्रेस ( Congress ) सरकारमध्ये अनेक मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. भोपाळ येथील कार्यालयात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan ) यांनी सुरेश पचौरी यांचे भाजपत स्वागत केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेश भाजप अध्यक्ष वी. डी. शर्मा म्हणाले, "सुरेश पचौरी हे मध्य प्रदेश काँग्रेसमधील राजकीय संत आहेत. त्यांचं स्थान काँग्रेसमध्ये नाही, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची गरज आहे. त्यामुळे ते भाजपत सामील झाले आहेत."

rahul gandhi narendra modi
Lok Sabha Election 2024 : आता कुठूनही लढा, मी तिथे..! भाजपवासी माजी न्यायाधीशांना ममतांचे आव्हान...

कशी आहे पचौरी यांची राजकीय कारकीर्द?

1972 मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुरेश पचौरी यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1984 मध्ये पचौरी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनले. त्यासह 1984, 1990, 1996, 2002 पचौरी काँग्रेसकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री म्हणून विविध खात्यांचा कार्यभारही पचौरी यांनी सांभाळला आहे. पचौरी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्षही राहिले आहेत.

rahul gandhi narendra modi
Congress Loksabha Candidate : काँग्रेसचा दक्षिण भारतावर फोकस; भाजपप्रमाणे महाराष्ट्रात 'वेट अँड वॉच'

सुरेश पचौरी यांनी राजकीय कारकिर्दीत फक्त दोन वेळा निवडणूक लढली आहे. 1999 मध्ये भोपाळ लोकसभा जागेवर भाजपच्या नेत्या उमा भारती यांच्याविरोधात पचौरी यांनी पहिली निवडणूक लढवली होती. पण, दीड लाख मतांनी पचौरी यांचा पराभव झाला, तर 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेंद्र पटवा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, पण त्याही निवडणुकीत पचौरी यांना पराभवाचा धक्का बसला होता.

R

rahul gandhi narendra modi
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या पहिल्या यादीत असं साधलं 'सोशल इंजिनिअरिंग'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com