Girija Vyas Accident: धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्री गिरीजा व्यास गंभीर जखमी, ओढणीने पेट घेतला; उपचारासाठी अहमदाबादला हलवलं

Rajasthan Congress Political Update : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या डॉ.गिरिजा व्यास नेहमीप्रमाणे पूजा करत होत्या. त्यावेळी त्यांच्या ओढणीला दिव्याचा स्पर्श झाला.
Girija Vyas .jpg
Girija Vyas .jpgSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : राजस्थान काँग्रेसमधील बडे प्रस्थ असलेल्या आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास यांच्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या पूजा करत असताना गंभीररित्या भाजल्या गेल्या आहेत. त्यांना उदयपूरहून अहमदाबादला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

उदयपूर येथे काँग्रेसच्या (Congress) नेत्या माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास यांच्याबाबतीत विचित्र दुर्घटना घडली. व्यास ह्या आपल्या निवासस्थानी देवांची पूजा करत असताना भाजून गंभीर जखमी झाल्या आहेत. देवघराच्या येथे लावलेल्या दिव्याच्या ज्योतीने त्यांच्या ओढणीनं अचानक पेट घेतल्यानं त्या गंभीररित्या भाजल्या गेल्या.

केंद्रीय मंत्री डॉ.गिरिजा व्यास यांना या अपघातानंतर उदयपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी अहमदाबादला उपचारासाठी रवाना केले आहे. या घटनेची माहिती काहीवेळातच काँग्रेसच्या गोटात पसरली आहे.

Girija Vyas .jpg
BJP New President : भाजपच्या गोटातून मोठी बातमी; नवा अध्यक्ष 'या' दिवशी ठरणार, महाराष्ट्रातील नेत्याचे नाव आघाडीवर ?

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या डॉ.गिरिजा व्यास नेहमीप्रमाणे पूजा करत होत्या. त्यावेळी त्यांच्या ओढणीला दिव्याचा स्पर्श झाला. यामुळे ही दुर्घटना घडली. गणगौरच्या पूजेदरम्यान ही घटना घडली आहे.

काँग्रेसच्या नेत्या गिरिजा व्यास चित्तोडगड मतदारसंघातून 15 व्या लोकसभेच्या सदस्य होत्या आणि भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राहिल्या आहेत. त्या 1985 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूर येथून विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आणि 1990 पर्यंत राजस्थान सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले.

Girija Vyas .jpg
Beed Jail Gang War Update: बीड कारागृह प्रशासनाचा मोठा निर्णय; कराड,घुलेला खरंच मारहाण? गित्तेचा मुक्कामच हलवला

तसेच 1991 मध्ये, त्या लोकसभेत उदयपूर,राजस्थानचे प्रतिनिधित्व करत भारतीय संसदेत निवडून आल्या आणि नरसिंह रावांच्या मंत्रालयात भारत सरकारमध्ये उपमंत्री (माहिती आणि प्रसारण) म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com