

ळो400 Corer Scam : रिअल इस्टेट ग्रुप M3Mचे संचालक बसंत बन्सल यांना अंमलबजावणी संचालनाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बसंत बंसल यांना अटक करण्यात आली. दोन्ही भावांवक मनी लाँण्ड्रिचे आरोप असून एमथ्रीएम आणि आयआरईओ समुहाने तब्बल ४०० कोटी रुपयांपेत्रा जास्त पैशांचे गैरव्यवहार केल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना तपासातून मिळाली आहे.
ईडीला या गैरव्यवहारांची माहिती कळताच ईडीने नुकतेच IREO ग्रुप आणि M3M ग्रुपच्या कार्यालयांवर धाडी टाकत आलिशान गाड्यांपासून दागिने आणि रोख रक्कम आणि दोन्ही भावांची बरीच मालमत्ता जप्त केली. M3M ग्रुपचे संचालक रूप कुमार बन्सल हे दिल्ली NCR मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांपैकी एक आहे.दिल्ली उच्च न्यायालयाने बसंत बंसल यांना ५ जुलैपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. पण जर बन्सल यांना अटक झालीच तर त्यांना काही अटी-शर्तींवर जामीन दिला जाईल, असेही न्यायालयाने म्हटले. (National News)
दिल्ली (Delhi) आणि गुरुग्राम येथील रिअल इस्टेट डेव्हलपर्सशी संबंधित सात ठिकाणांवर छापेमारी करत ईडीने काही दिवसांपूर्वी रूप कुमार बंसल यांना अटक केली होती. त्यानंतर लगेच एम3एमच्या ठिकाणांवरही छापेमारी करत ६० कोटींच्या आलिशान गाड्या आणि ६ कोटींचे दागिनेही इडीने जप्त केले आहेत.
आयआरईओ ग्रुपच्या विरोधात अनेक एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या या तक्रारींच्या आधारे ईडीने ही कारवाई केली होती. गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी अनेक एफआयआरच्या आधारे ईडी आयआरईओ ग्रुपची चौकशी करत आहे.
- काय आहे प्रकरण?
ईडीने (ED) दिलेल्या माहितीनुसार M3M ग्रुपला IREO समुहाकडून काही शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये मिळाले. ही रक्कम विकास हक्कामार्फत देयक म्हणून दाखवण्यात आली होती. M3M ग्रुपची असलेल्या या जमिनीचे बाजारमूल्य चार कोटी रुपये इतके होते.पण कंपनीने ही जमीन पाच शेल कंपन्यांना १० कोटी रुपये देऊन विकली.
यानंतर,शेल कंपन्यांनी याच जमिनीचे विकास हक्क IREO समूहाला सुमारे ४०० कोटी रुपयांना विकले आणि लगेच त्याचे हस्तांतरही करण्यात आले. शेल कंपन्यांनी पैसे मिळाल्यानंतर पैसे M3M ग्रुपला ट्रान्सफर केले. या शेल कंपन्या M3M समूहाद्वारे चालवल्या जात असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या तपासातून उघडकीस आली.
असे अडकले बंसल कुटूंब
यंत्रणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व शेल कंपन्या M3M ग्रुपच्या मालकीच्या होत्या. बसंत बन्सल,रूप कुमार बन्सल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या कंपन्यां बनवल्या होत्या. पण या कंपन्यांनी गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या ४०० कोटी रुपयांचा गैरवापर केल्याची माहिती मिळाली होती. गैरव्यवहार केलेली रक्कम M3M ग्रुपकडेच राहिली आणि रक्कम गुंतवणूक व दायित्वे फेडण्यासाठी वापरली गेली.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.