Ghooskhor Pandat Row: 'घुसखोर पंडत'वरुन युपीच्या राजकारणात खळबळ! CM आदित्यनाथ अन् मायावती आले एकत्र; नेमका प्रकार काय?

Ghooskhor Pandat Movie Row: या सिनेमाच्या नावावरुन हा वाद निर्माण झाला असून या सिनेमाच्या दिग्दर्शकासह संपूर्ण टीमविरोधात लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Ghooskhor Pandat Movie Row
Ghooskhor Pandat Movie Row
Published on
Updated on

Ghooskhor Pandat Movie Row: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या 'घुसखोर पंडत' नावाच्या सिनेमावरुन उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाच्या नावावरुन हा वाद निर्माण झाला असून या सिनेमाच्या दिग्दर्शकासह संपूर्ण टीमविरोधात लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धार्मिक आणि जातीय भावना भडकवल्याचा आरोप या एफआयआरमध्ये लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती यांनी याप्रकरणात उडी घेत ब्राह्मण समाजाला आपला पाठिंबा दिला आहे.

Ghooskhor Pandat Movie Row
Video: ओवैसींच्या नगरसेवकानं चक्क भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला केलं मतदान! कुठे घडला हा प्रकार? व्हिडिओ व्हायरल

नेमका वाद काय?

'घुसखोर पंडत' या नावाच्या सिनेमाची जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये याविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसंच या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर दिल्ली हायकोर्टात देखील या सिनेमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये सिनेमाची कथा ही वादग्रस्त असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर यामुळं सोशल मीडियावर जातीय भावनांना दुखावल्या जाऊन सामाजिक सौहार्द बिघडू शकतं अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

Ghooskhor Pandat Movie Row
Shivsena News : एकनाथ शिंदेंनी उपमहापौरपदासाठी दिलेल्या उमेदवाराला संजय शिरसाट यांचा विरोध? दुसरा उमेदवार देताच शिवसेना सचिवांचे तातडीने पत्र

याप्रकरणी लखनऊच्या पोलीस आयुक्त कार्यालयानं हे स्पष्ट केलं आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शून्य सहिष्णुता (झिरो टॉलरन्स) धोरणांतर्गत कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी तसंच शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. पोलिसांचं म्हणणं आहे की, ही कारवाई उपलब्ध सामग्रीच्या आकलनाच्या आधारावर करण्यात आली आहे.

Ghooskhor Pandat Movie Row
Baramati plane crash: अजितदादांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांना दिल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना

घुसखोर पंडत या सिनेमावर आरोप आहे की, या सिनेच्या नावात आणि कथेमध्ये एका विशिष्ट जाती समुदयाच्या (ब्राह्मण) संदर्भात आक्षेपार्ह संदर्भांचा वापर करण्यात आला आहे. यामुळं धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावू शकतात. या सिनेमाच्या ट्रेलर आणि काही दृश्यांच्या आधारे आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटात अशा गोष्टी आहेत. ज्या सामाजिक सौहार्द आणि सार्वजनिक व्यवस्थेला प्रभावित करतात. त्याचबरोबर अशांतता पसरवणं आणि वैमनस्य वाढीला उत्तेजन दिलं जाण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.

Ghooskhor Pandat Movie Row
DSP Kalpana Verma: ब्यूटीफुल अन् डॅशिंग 'डीएसपी' महिला अधिकारी तडकाफडकी सस्पेंड, पोलिस प्रशासनात खळबळ

नीरज पांडे, मनोज वाजपेयीही बोलले

या वादावर 'घुसखोर पंडत'चे दिग्दर्शक नीरज पांडे आणि प्रमुख कलाकार मनोज वाजपेयी यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं की, "आमचा सिनेमा हा एक काल्पनिक पोलीस ड्रामा आहे. यासिनेमच्या नावात 'पंडत' हा शब्द केवळ एक काल्पनिक पात्राच्या वागण्याबोलण्यावरुन घेतलेलं आहे. या सिनेमाच्या नावावरुन काही लोकांच्या भावना दुखावली गेली आहे. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो त्यामुळंच आम्ही सध्या या सिनेमाच्या सर्व प्रचार साहित्य हटवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्हाला वाटतं की, सिनेमा लोकांनी आधी पूर्ण बघितला पाहिजे त्याचबरोबर कथेच्या संदर्भात तो समजूनही घेतला गेला पाहिजे. त्यातील अल्प भागावर कोणीही मत बनवता कामा नये"

Ghooskhor Pandat Movie Row
Amravati Mayor : CM फडणवीस अन् बावनकुळेंची 'टाईट फिल्डिंग'; काँग्रेसला रिंगणाबाहेर ढकलत आणखी एका महापालिकेत भाजपचा महापौर

मायावतींचा ब्राह्मणांना पाठिंबा

दुसरीकडं या वादात माजी मुख्यमंत्री मयावाती यांनी देखील उडी घेतली असून त्यांनी शुक्रवारी मनोज वाजपेयी अभिनीत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या घुसखोर पंडत या सिनेमावर बंदी आणावी तसंच कायदेशीर कारवाई करावी. हा सिनेमा ब्राह्मण समाजाचा अवमान करणारा आणि अनादर करणारा आहे. या सिनेमामुळं ब्राह्मण समाजात मोठ्या प्रमाणावर राग असून आमचा पक्ष बसपाही या सिनेमाला कठोर शब्दांत निषेध करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com