Rahul Gandhi protest : सोनम वांगचुक यांच्या पत्नीला पटलं नाही राहुल गांधींचं वागणं; जिव्हारी लागणारा शब्द वापरला...

Gitanjali Angmo, Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांचा राहुल गांधींवर घणाघाती आरोप; पीएम निवासस्थानाबाहेरील आंदोलनाला ‘ढोंगी’ ठरवत जंतरमंतरवर न येण्यावरून सवाल.
Gitanjali Angmo criticized Rahul Gandhi over his protest outside the Prime Minister's residence.
Gitanjali Angmo criticized Rahul Gandhi over his protest outside the Prime Minister's residence.Sarkarnama
Published on
Updated on

Delhi protest update : नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात रान उठले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनालाही दिवसागणिक प्रतिसाद वाढत चालला आहे. दुसरीकडे काँग्रेससह विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारला धारेवर धरत दबाव वाढविला आहे. दोन दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले होते.

पंतप्रधानांच्या घराबाहेरील आंदोलनादरम्यान राहुल गांधींसह अन्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी झालेला झटापटीत राहुल यांच्या नाकातून रक्त आले होते. या आंदोलनामुळे काँग्रेस फ्रंटफूटवर आले. मात्र, आता मागील 26 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.

'इंडिया टुडे'शी बोलताना गीतांजली आंग्मो यांनी राहुल यांचे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन योग्य नव्हते असे म्हटले आहे. त्यांनी जंतरमंतरवर यायला हवे होते. हे आंदोलन म्हणजे इनसिंसिअर (ढोंगीपणाचे) असल्याची टीका आंग्मो यांनी केली आहे. एकीकडे काँग्रेसकडून या आंदोलनाचे भांडवल केले जात असताना वांगचूक यांच्या पत्नीकडूनच त्यावर टीका झाल्याने पक्षाची कोंडी झाली आहे.

Gitanjali Angmo criticized Rahul Gandhi over his protest outside the Prime Minister's residence.
Parliament news : भाजपच्या खासदारांना प्रियांका गांधी भिडल्या; संसदेच्या आवारात सत्ताधारी-विरोधकांमध्ये घमासान

नेमकं काय म्हणाल्या आंग्मो?

एका प्रश्नाचे उत्तर देताना आंग्मो यांनी म्हटले की, भारताच्या उज्वल भविष्याची चिंता करणाऱ्या प्रत्येक पक्ष आणि व्यक्तीसोबत आम्ही आहोत. पीएमओ बाहेर झालेल्या आंदोलनामध्ये प्रामाणिकपणा नव्हता. या मुद्द्यावर ते प्रामाणिक असते तर जंतरमंतरवर विद्यार्थ्यांसोबत असते. लोकांना आता तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही. खडबडून जागा झालेला हा भारत आहे. त्यांनी (काँग्रेस) प्रामाणिकपणे साथ द्यायला हवी.

Gitanjali Angmo criticized Rahul Gandhi over his protest outside the Prime Minister's residence.
Rahul Gandhi protest : राहुल गांधींनी फिरवलं राजकारण! काँगेसच्या मनासारखं घडलं... एक घटना ठरली गेमचेंजर

आम आदमी पक्षाकडूनही राहुल यांच्या आंदोलनावर टीका करण्यात आली आहे. भाजप आणि काँग्रेसने हातमिळविणी केल्याचा गंभीर आरोप आपने केला होता. आता आंग्मो यांचा व्हिडिओ पोस्ट करत पुन्हा एकदा टीका केली आहे. जंतरमंतरवरील आंदोलनाचे महत्व कमी करण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला होता. संसदेचे कामकाज सुरू झाल्यापासून विरोधकांच्या आंदोलनातून आपने अंग काढून घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com