Bank Employee Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! लवकरच पगार वाढणार; सरकारचे स्पष्ट संकेत

Bank Employees Salary Hike Soon: सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! १३वा वेतन करार लवकर सुरू होणार असून पगारवाढीचे स्पष्ट संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.
Bank Employees Salary Hike Soon
Bank Employees Salary Hike SoonSarkarnama
Published on
Updated on

Bank Employees News: केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (PSBs) नवीन वेतन कराराची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे येत्या काळात लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे नेमका निर्णय?

सरकारने १३व्या द्विपक्षीय वेतन करारासाठी चर्चा तातडीने सुरू करण्यास सांगितले आहे. हा करार पुढील १ नोव्हेंबर २०२७ पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया १२ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये.

वेतन करार कसा ठरतो?

या प्रक्रियेत

  • Indian Banks' Association (IBA)

  • कर्मचारी संघटना

  • बँक व्यवस्थापन

यांच्यात चर्चा होते. सर्वांच्या संमतीने अंतिम वेतन करार निश्चित केला जातो. वेळेवर करार झाल्यास कामकाजातील स्थिरता राखली जाते आणि कर्मचाऱ्यांचा असंतोष टाळता येतो.

Bank Employees Salary Hike Soon
High Court Order: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोर्टाचा आदेश; पोपटांमुळे नुकसान झाल्यास भरपाई द्या!

५ वर्षांनी होते वेतन सुधारणा

भारतामध्ये बँक आणि विमा क्षेत्रात साधारणतः दर ५ वर्षांनी वेतन सुधारणा केली जाते. त्यामुळे आता १३व्या वेतन कराराची तयारी सुरू होणं अपेक्षित होतंच. मात्र, यावेळी सरकारने स्वतः पुढाकार घेत प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

Bank Employees Salary Hike Soon
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट; TA आणि मुलांच्या शिक्षण भत्त्यात वाढ होणार? सुट्ट्यांमध्येही बदलाचा प्रस्ताव

बँकिंग क्षेत्राची मजबूत स्थिती

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या काही वर्षांत विक्रमी कामगिरी केली आहे:

  • २०२३: ₹1.05 लाख कोटी नफा

  • २०२४: ₹1.41 लाख कोटी नफा

  • २०२५: ₹1.78 लाख कोटी नफा

कर्ज वितरणातील वाढ, सुधारलेली मालमत्ता गुणवत्ता (Asset Quality) आणि मजबूत भांडवली स्थिती यामुळे बँकिंग क्षेत्र अधिक स्थिर झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरतो.

Bank Employees Salary Hike Soon
Maharashtra Govt Decision: शिक्षकांना मोठा दिलासा! सरकारचा निर्णय; UGC स्केल लागू, वेतन-DA मध्ये भरघोस वाढ

कर्मचाऱ्यांसाठी काय फायदा?

  • वेळेवर वेतनवाढ

  • भत्ते व सुविधांमध्ये वाढ

  • कामातील समाधान आणि मनोबल वाढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com