Gyanesh Kumar SIR Protest : ज्ञानेश कुमार पदावर राहिल्यास लोकशाहीचा घात? 'SIR' विरोधी आक्रमक आंदोलनाचा भडका; आता धुळे-जळगावतही ठिणगी!

Gyanesh Kumar resignation protest in Maharashtra : SIR प्रक्रियेच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात आंदोलन तीव्र झाले आहे. धुळे-जळगावातही विरोधक रस्त्यावर उतरले.
Gyanesh Kumar- Chief Election Commissioner of India
Gyanesh Kumar resignation protest in MaharashtraSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gyanesh Kumar SIR protest News : निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभर संतप्त आंदोलन होत आहे. दिल्लीत कधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन झाले. त्यामुळे केंद्र सरकार अडचणीत आले आहे. या आंदोलनाची ढग आता देशभर पसरू लागली आहे. सलग दोन दिवस जळगाव आणि धुळे येथे इंडिया आघाडीने जोरदार आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे पदावर राहिल्यास देशातील लोकशाहीचा घात होईल, अशी भीती नेत्यांनी व्यक्त केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशाच्या निवडणूक प्रक्रियेला सत्ताधारी भाजपची बटीक बनवली आहे. वोट चोरी करून सत्ताधारी पक्ष निवडणुका जिंकत आहे. देशाच्या राज्यघटनेला हा मोठा धोका निर्माण करण्याचे घातक कार्य ज्ञानेश कुमार यांनी केले असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.

Gyanesh Kumar- Chief Election Commissioner of India
IAS transfer : प्रशासनात अचानक 'सर्जिकल स्ट्राइक'! एकाच रात्रीत 42 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

या संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी विरोधी पक्षाने आंदोलन केले. बुधवारी धुळे शहरात इंडिया आघाडी एकवटली. गणेश कुमार यांच्या विरोधात धुळे शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले. आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या वर्षभरात नियमबाह्य पद्धतीने काम केले. त्यांचे सहकारी आयुक्त सुखबीर सिंग आणि विवेक जोशी यांनी चौदा वेळा त्यांच्या निर्णयाला आक्षेप घेतला. लिखित स्वरूपात नियमबाह्य काम लक्षात आणून दिले. मात्र ज्ञानेश कुमार यांनी नियमबाह्य पद्धतीने काम सुरूच ठेवले होते.

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत 47 लाख बोगस मतदारांची नोंदणी केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप आघाडीला खोटा विजय मिळाला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत देखील त्याची पुनरावृत्ती करण्यात आली. पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून 92 लाख मतदार वगळण्यात आले. बिहारमध्येही असाच घोटाळा झाला. त्याचा फायदा एनडीएला झाला आहे.

Gyanesh Kumar- Chief Election Commissioner of India
i-Sarita Property Card Online : भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; ‘आय-सरिता’शी जोडणीमुळे नागरिकांच्या कार्यालयीन फेऱ्या थांबणार

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक यादीतील गैरव्यवहार स प्रमाण सिद्ध केला आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. राजीनामा होईपर्यंत देशभर आंदोलन सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर येलमामे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष बंटी सोनवणे, साबीर शेख, नरेंद्र परदेशी, वाल्मीक मराठे यांसह विविध नेत्यांनी आंदोलनात भाग घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com