i-Sarita Property Card Online : भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; ‘आय-सरिता’शी जोडणीमुळे नागरिकांच्या कार्यालयीन फेऱ्या थांबणार

Maharashtra Property Card Process Gets a Digital : नवीन प्रणालीमध्ये मृत्युपत्र व इच्छापत्र नोंद, हस्तांतरण करार व कन्फर्मेशन डीड, रद्द करार, भाडेपट्टा नोंद, दुरुस्ती पत्र, सलिमेंटरी डीड ऑफ डिक्लेरेशन आणि वारस हक्क नोंद अशा विविध व्यवहारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्डवरील नोंदी अधिक वेगाने आणि सुलभ पद्धतीने करता येणार आहेत.
Property Card Online | Will Registration | I-Sarita
The new digital property card system enables online registration of wills, leases and property transfers, reducing the need for office visits.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 08 Oct : घर, जमीन किंवा सदनिकेच्या प्रॉपर्टी कार्डवर मृत्युपत्र, इच्छापत्र, भाडेपट्टा, हस्तांतरण करार यांसारख्या कायदेशीर व्यवहारांच्या नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना नगर भूमापन कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. भूमी अभिलेख विभागाने ई-मिळकत पोर्टलवर या नोंदींसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या अर्ज करता येणार असून, प्रॉपर्टी कार्डवरील फेरफार प्रक्रियेलाही मोठी गती मिळणार आहे.

यापूर्वी प्रॉपर्टी कार्डवरील विविध नोंदींसाठी नागरिकांना संबंधित नगर भूमापन कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत होते. अनेक कायदेशीर व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या नोंदींची सुविधा मर्यादित असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. आता भूमी अभिलेख विभागाने उपलब्ध मॉड्यूल्सची संख्या वाढवून ६ वरून १४ मॉड्यूल्स केली आहे.

मृत्युपत्रापासून वारस हक्क नोंदीपर्यंत सुविधा

नवीन प्रणालीमध्ये मृत्युपत्र व इच्छापत्र नोंद, हस्तांतरण करार व कन्फर्मेशन डीड, रद्द करार, भाडेपट्टा नोंद, दुरुस्ती पत्र, सलिमेंटरी डीड ऑफ डिक्लेरेशन आणि वारस हक्क नोंद अशा विविध व्यवहारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्डवरील नोंदी अधिक वेगाने आणि सुलभ पद्धतीने करता येणार आहेत.

'आय-सरिता’शी थेट जोडणी

दस्तनोंदणी प्रक्रियेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. भूमी अभिलेख विभागाची प्रॉपर्टी कार्ड प्रणाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ‘आय-सरिता’ प्रणालीशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे घर, जमीन किंवा सदनिकेची दस्तनोंदणी करताना सरकारी अभिलेखातील अधिकृत प्रॉपर्टी कार्ड संगणकावर आपोआप उपलब्ध होणार आहे. यापूर्वी दस्तनोंदणी करताना प्रॉपर्टी कार्डची प्रत्यक्ष प्रत जमा करावी लागत होती. आता ही प्रक्रिया डिजिटल झाल्याने नागरिकांचा वेळ वाचणार असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करण्यालाही मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.

Property Card Online | Will Registration | I-Sarita
Nana Patekar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

न्यायालयीन आदेशांचा फेरफार एका दिवसात

न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरणाच्या आदेशानंतर प्रॉपर्टी कार्डवर फेरफार नोंद करण्याच्या प्रक्रियेलाही वेग देण्यात आला आहे. यापूर्वी अशा प्रकरणांच्या फाईली मंजुरीच्या प्रतीक्षेत सुमारे १५ दिवस पडून राहत होत्या. आता अपीलची मुदत संपलेल्या न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी स्वयंचलित पद्धतीने एका दिवसात करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

डेटाबेसही झाला अधिक सक्षम

भूमी अभिलेख विभागाच्या इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी कार्ड इन्फॉर्मेशन सिस्टीमचा डेटाबेसही अद्ययावत करण्यात आला आहे. तब्बल ७२ तासांची तांत्रिक प्रक्रिया राबवून सुरक्षित डेटा मायग्रेशन करण्यात आले. त्यामुळे प्रॉपर्टी कार्डची माहिती पाहणे, डाउनलोड करणे आणि ऑनलाइन सेवा वापरण्याचा वेग वाढणार आहे.

Property Card Online | Will Registration | I-Sarita
DCC Bank Elections : जिल्हा बँक निवडणुकीबाबत मोठी घडामोड! 10 वर्षांच्या नियमाने धसका घेतलेल्या संचालकांना दिलासा

नागरिकांना नेमका फायदा काय?

मृत्युपत्र व इच्छापत्राची नोंद ऑनलाइन करता येणार आहे. भाडेपट्टा व हस्तांतरण कराराच्या नोंदी सुलभ होणार आहे.प्रॉपर्टी कार्डसाठी कार्यालयीन फेऱ्या कमी होणार आहे.आय-सरिता’मुळे अधिकृत प्रॉपर्टी कार्ड थेट उपलब्ध होणार आहे. तसेकंज न्यायालयीन आदेशांवरील फेरफार एका दिवसात होणार असून ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड पाहणे व डाउनलोड करणे अधिक वेगवान होणार आहे. एकूणच, प्रॉपर्टी कार्डवरील फेरफार प्रक्रियेला डिजिटल गती देत भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. विशेषतः वारस हक्क, मृत्युपत्र आणि हस्तांतरणासारख्या व्यवहारांमध्ये ही ऑनलाइन सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com