Harish Rana death : देशाला रडवून गेला हरीश राणा; 13 वर्षांपासून होता कोमात, ‘एम्स’मध्ये घेतला अखेरचा श्वास...

Harish Rana death news, Passive Euthanasia india case : हरीशच्या आई-वडिलांनी मुलाच्या इच्छामरणाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. एम्सने तो कधीच बरा होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे स्पष्ट केले होते.
Harish Rana death news
Harish Rana death newsSarkarnama
Published on
Updated on

देशातमध्ये पहिल्यांदाच इच्छामरणाची परवानगी मिळालेल्या हरीश राणा याने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. मागील १३ वर्षांपासून तो कोमामध्ये होता. या काळात त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमचा आधार होता. मात्र, आई-वडिलांनी सुप्रीम कोर्टात त्याच्या इच्छामरणासाठी (Passive Euthanasia) याचिका दाखल केली होती. कोर्टाने ही विनंती मान्य करत इच्छामरणास परवानगी दिली होती.   

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हरीशला १४ मार्च रोजी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले होते. मागील दहा दिवसांपासून त्याचे खाणे-पिणे तसेच वैद्यकीय उपचार पूर्णपणे बंद करण्यात आले होते. ३१ वर्षीय हरीश राणाच्या इच्छामरणास कोर्टाने ११ मार्चच्या ऐतिहासिक निकालाने परवानगी दिली होती.

हरीश हा मुळचा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील आहे. १३ वर्षांपूर्वी अभियांत्रिकी शिक्षणासाठी चंदीगढ येथे हॉस्टेलमध्ये राहत होता. तो या हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडला होता. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोमामध्ये आहे.

Harish Rana death news
PM Narendra Modi Speech : क्षणाक्षणाला स्थिती बदलतेय, प्रत्येक आव्हानासाठी सज्ज राहा! देशात इंधनाचा साठा किती? PM मोदींनी दिली माहिती...

हरीशच्या आई-वडिलांनी मुलाच्या इच्छामरणाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. एम्सने तो कधीच बरा होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे स्पष्ट केले होते. कोर्टानेच याबाबत एम्सकडे अहवाल मागविला होता. या अहवालाच्या आधारे कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत हरीश राणाचा लाईफ सपोर्ट हटविण्यास परवानगी दिली होती.

Harish Rana death news
Election Commission : धक्कादायक : निवडणूक आयोगाने पक्षांना पाठविलेल्या पत्रावर भाजपचा शिक्का; कबूली देत अधिकारी सस्पेंड

कोर्टाच्या निकालानंतर हरीशचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. गाझियाबाद येथील घरातील हे भावूक करणारे दृश्य होते. ब्रम्हाकुमार संस्थेतील एक महिला सदस्य हरीश कपळावर टिळा लावताना दिसत होत्या. अत्यंत शांतपणे हरीश म्हणत होत्या की, ‘सर्वांना क्षमा करून णि सर्वांची माफी मागून आता शांतपणे विश्राम करा.’ या व्हिडीओमुळे अनेकांचे डोळे पाणावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com