kangana Ranaut : कंगना रणौत यांची खासदारकी धोक्यात? कोर्टाने दिली नोटीस

kangana Ranaut Election Challenge :मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा 74 हजार 755 मतांनी पराभव केला. कंगना यांची निवड रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
Vikramaditya Singh, Kangana Ranaut
Vikramaditya Singh, Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

kangana Ranaut News : अभिनेत्री, भाजपच्या हिमाचलमधील खासदार कंगना रणौत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगना रणौत यांची खासदारकी रद्द करण्यासंदर्भात हिमाचल हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाने कंगना यांना नोटीस पाठवत त्यांचे उत्तर मागवले आहे.

कंगना यांना कोर्टाने उत्तर सादर करण्यासाठी 21 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या लायक राम नेगी यांनी कंगनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

सरकारी कर्मचारी नेगी यांनी निवडणूक लढण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांना ते विजयी होतील असा आत्मविश्वास होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धती रद्द केला. त्यामुळे कंगना रणौत यांची निवड रद्द करावी आणि पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी नेगी यांनी केली आहे.

Vikramaditya Singh, Kangana Ranaut
Ambadas Danve On Abdul Sattar : भाजपचे निष्ठावंत किती अपमान सहन करणार ; सत्तारांना पालकमंत्री पद मिळताच अंबादास दानवेंनी डिवचले..

अधिकाऱ्यांकडून अडवणूक

नेगी यांनी आरोप केला आहे की स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रे तयार केली होती. त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या वापरातील नो ड्यूजचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशीची वेळ देण्यात आली होती. त्यांनी नो ड्यूजचे प्रमाणपत्र सादर केले. मात्र ते अधिकाऱ्यांनी न स्वीकारता त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्याचे आक्षेप याचिकेद्वारे नेगी यांनी घेतला आहे.

काँग्रेस उमेदवाराचा पराभव

मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा 74 हजार 755 मतांनी पराभव केला. कंगना यांना 5 लाख 37 मतं मिळाली होती. तर, विक्रमादित्य यांना 4 लाख 62 हजार मतं मिळाली होती.

Vikramaditya Singh, Kangana Ranaut
Anil Kadam Politics: अनिल कदम यांच्या मार्गात यंदाही भाऊबंदकीचा अडसर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com