चेन्नई : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलातील (IAF) महिला अधिकाऱ्यावर फ्लाईट लेफ्टनंट अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला अटक केली आहे. आता या महिला अधिकाऱ्याने पोलिस तक्रारीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान डॅाक्टरांनी बंदी घातलेली 'टू फिंगर टेस्ट' केल्याचा खळबळजनक आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडित महिलेवर दोन आठवड्यांपूर्वी लैंगिक अत्याचार झाला आहे. त्यावेळी त्यांनी याबाबतची तक्रार सुरूवातीला हवाई दलाकडे केली होती. पण प्रत्यक्षात तक्रारीवर अपेक्षित कारवाई झाली नाही. दोनवेळा त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी सांगण्यात आले होते. एका पत्रावर सही करण्यासाठी दबावही टाकण्यात आला. पण पण तक्रार मागे घेतली नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार करावी लागली, असं या महिलेने म्हटले आहे.
महिला अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर 29 वर्षीय अधिकाऱ्या रविवारी अटक करण्यात आली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये महिनेने गंभीर आरोप केले आहेत. हवाई दलाकडे केलेल्या तक्रारीनंतर वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी बंदी असलेली टू-फिंगर टेस्ट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी लैंगिक अत्याचाराची दुसऱ्यांदा बळी ठरल्याचे या महिलेने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयानेच टू-फिंगर टेस्टवर बंदी घातलेली आहे. पण त्यानंतर ही टेस्ट करण्यात आल्यानं महिला अधिकाऱ्याला धक्का बसला. याबाबत त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. या महिलेसोबत कोईम्बतूर येथील हवाई दलाच्या प्रशासकीय महाविद्यालयात त्यांच्या खोलीत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. शहरातील गांधीपुरम पोलिस ठाण्यात एक महिला अधिकाऱ्यांची टीम या घटनेचा तपास करत आहे.
संबंधित अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. एका हवाई दलाच्या अधिकाऱ्याला पोलीस अटक करू शकत नाहीत, असे म्हणत त्याच्या वकिलांनी विरोध केला होता. लष्कराच्या प्रक्रियेचे पालन व्हायला हवे, असा दावा वकिलांनी न्यायालयात केला होता. पण न्यायालयानं या अधिकाऱ्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, याबाबत हवाई दलानेही निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. हवाई दलाकडून पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहकार्य केले जात आहे. तसेच दलाकडून अंतर्गत चौकशीही सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यानं त्यावर फारसे बोलू शकत नाही, असं दलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.