Nitish Kumar Resign: नीतीश कुमारांनी राजीनामा देताच तेजस्वी यादव यांचं खळबळजनक विधान; म्हणाले, महिलांच्या खात्यात १ लाख ९० हजार..

Nitish Kumar Resign : नीतीश कुमार यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळं त्यांनी आपला बिहारच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Nitish Kumar, Tejashwi Yadav
Nitish Kumar, Tejashwi YadavSarkarnama
Published on
Updated on

Nitish Kumar Resign: नीतीश कुमार यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळं त्यांनी आपला बिहारच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संसदेच्या सभागृहाचा सदस्य झाल्यानंतर इतर कुठल्याही सभागृहाच्या सदस्यपदी राहता येत नाही. त्यामुळं त्यांना राजीनामा देणं क्रमपात्र होतं. पण आता त्यांची राज्य विधीमंडळाची सदस्यता संपुष्टात आल्यामुळं सहाजिकच मुख्यंमत्रीपदाचाही त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पण तो अद्याप त्यांनी दिलेला नाही, पण लवकरच त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील होऊ शकतो. दरम्यान, त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यावर माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचबोरबर एक खळबजनक विधानही केलं.

Nitish Kumar, Tejashwi Yadav
Neelam Gorhe: "गर्दीत येऊन खरात भेटला असेल तर आठवतं नाही," आरोपांवर नीलम गोऱ्हेचं उत्तर; स्पष्ट केली सविस्तर भूमिका

तेजस्वी यादव म्हणाले, आम्ही सुरुवातीपासून हे सांगतोय की, निवडणुकीनंतर नीतीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री राहणार नाहीत. हे हुबेहुब महाराष्ट्रासारखं रिपॅकेजिंग करुन नव्या प्रकारे यांना काही दिवसांसाठी म्हणजेच दोन-तीन महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवलं. भाजपनं लोकांना ठगण्याचं काम केलं आहे. यामध्ये नीतीश यांना त्यांनी ठगवलंय तसंच महिलांनाही ठगवलं आहे, त्यांच्या खात्यात १ लाख ९० हजार रुपये अजूनही वाटलेले नाहीत, निवडणुकीच्या दिवशी १०,००० रुपये वाटले गेले. त्यावेळी सांगितलं की, उरलेले १ लाख ९० हजार रुपये देखील खात्यात जमा केले जातील. बिहारमध्ये वीजेची किंमत देशात सर्वाधिक होती, निवडणुकीनंतर आणखी वीज महाग झाली आहे. त्यामुळं यांनी बिहारच्या लोकांनाही फसवलं आहे. नितीश कुमार यांनी जेव्हा महागठबंधन आणि इंडिया आघाडी सोडली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तेव्हाच हे निश्चित झालं होतं की, नितीश कुमारांना हे लोक बिहारमध्ये राहू देणार नाहीत.

Nitish Kumar, Tejashwi Yadav
Rupee Falls: सीतारामण यांच्याकडून संसदेत अर्थव्यवस्थेचे गोडवे गायले जात असताना रुपया गडगडला! आजवरची गाठली सर्वात निचांकी पातळी

दरम्यान, नीतीश कुमार राज्यसभेवर गेल्यामुळं आता बिहारच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार आहेत. कारण जेव्हा ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील तेव्हा संपूर्ण मंत्रीमडळ बरखास्त होईल, त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यासह संपूर्ण मंत्रीमंडळ नव्यानं स्थापन होईल. पण यावेळी मुख्यमंत्री हा भाजपचा असेल असं सांगितलं जात आहे. त्यामुळं बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याची आता सगळीकडं उत्सुकता आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तसंच जनता दल युनायटेड या नीतीश कुमारांच्या पक्षाची धुरा देखील त्यांच्या मुलाच्या खांद्यावर देणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com