बड्या नेत्यांनी धक्का देताच भाजपकडून मित्रपक्षांना पायघड्या

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रतिष्ठेच्या लढाईत आपल्या युतीच्या दोन्ही पक्षांबरोबरचा जागावाटप फॉम्यूर्ला निश्चित केल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रतिष्ठेच्या लढाईत आपल्या युतीच्या दोन्ही पक्षांबरोबरचा जागावाटप फॉम्यूर्ला निश्चित केल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. यानुसार निषाद पक्षाला १० तर केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anipriya Patel) यांच्या अपना दलाला वाढवून दिलेल्या १८ जागा भाजपने सोडल्या आहेत. ४०३ पैकी उर्वरीत जागांवर भाजपचे (BJP) उमेदवार निवडणूक लढतील.

BJP
भाजपची मोठी खेळी; अखिलेश यांच्याविरोधात थेट केंद्रीय मंत्र्यालाच तिकीट

उत्तर प्रदेशात स्वामीप्रसाद मौर्य व अन्य काही आमदारांनी भाजप सोडल्याने धक्का बसला आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील उमेदवार यादी जाहीर होताच उसळलेल्या पक्षांतर्गत असंतोषाच्या धक्क्यातून सावरताना भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने अनेक निर्णय घेतले. युतीतील दोन्ही पक्षांबरोबर जागावाटपात आधीपेक्षा बरेच लवचिक धोरण भाजपने स्विकारले. यापूर्वीच्या सूत्रानुसार निषाद पक्षाला ४ ते ५ व अपना दलाला ८ ते १० जागा सोडण्याची तयारी भाजपने दाखविली होती.

दोन्ही पक्षांनी तो फॉम्यूर्ला नाकारला. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व पक्षाध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) यांनी संजय निषाद व पटेल यांच्याबरोबर अनेकदा चर्चा केली. दलित व ओबीसी आमदार पक्ष सोडून चालल्याने भाजपने आपलेही धोरण काहीसे बदलून दोन्ही पक्षांना ठरविल्यापेक्षा दुपटीने जागा वाढवून दिल्या आहे. उत्तर प्रदेशात भाजप आघाडीच पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केला. भाजप आघाडी विकास व सामाजिक न्यायाचे उत्तम 'कॉकटेल' आहे असे त्यांनी सांगितले.

BJP
वडील विरोधी पक्षाचे उमेदवार अन् भाजपच्या खासदार मुलीने दाखवला पक्षाला ठेंगा...

गोंडामध्ये बंडखोरी

गोडा जिल्ह्याच्या कर्नलगंज विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार अजय प्रताप सिंह उर्फ लल्ला भैया यांचे तकीट कापून अजय कुमार सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे लल्ला भैय्या यांनी उघड बंडखोरी केली आहे. त्यांनी सपा उमेदवार योगेश प्रताप सिंह यांना जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली. गोंडा जिल्ह्यात लल्ला भैय्या यांचा मोठा प्रभाव असल्याने त्यांच्या बंडखोरीचा भाजपवर मोठा परिणाम होईल अशी भिती व्यक्त केली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com