Pm Modi Iran War : तिसऱ्या महायुध्दाचे सावट; PM मोदींचा थेट जगातील दोन ताकदवान नेत्यांना फोन, दिला खास संदेश

Iran Israel war news, India alert mode, CCS meeting India : मागील आठवड्यातच पंतप्रधान मोदी इस्त्राईल दौऱ्यावर होते. त्यानंतर काही तासांतच इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला चढविला.
Iran–Israel Tension
Iran–Israel TensionSarkarnama
Published on
Updated on

Strategic diplomacy India : इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ला चढवत त्यांच्या सर्वोच्च नेत्याचा खात्मा केला आहे. त्यानंतर इराण चांगलाच भडकला असून जोरदार प्रतिहल्ले केले जात आहेत. या युध्दात आता आखातातील इतर देशही भरडले जाऊ लागले असून तिसऱ्या महायुध्दाची भीती व्यक्त केली जात आहे. या युध्दाचा थेट परिणाम भारतावर होऊ लागला आहे. या घडामोडी घडत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राक्षी दिल्लीत सुरक्षाविषयक उच्चस्तरीय बैठक घेतली.

पंतप्रधान मोदींनी युध्दाच्या पार्श्वभूमीवर काही तासांतच जगातील दोन ताकदवान देशांच्या प्रमुखांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला आहे. इराण युध्दात सर्वात मोठी भूमिका बजावणाऱ्या इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी मोदींनी संवाद साधला.

मागील आठवड्यातच पंतप्रधान मोदी इस्त्राईल दौऱ्यावर होते. त्यानंतर काही तासांतच इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला चढविला. आता पंतप्रधान मोदींनी थेट नेतन्याहू यांना फोन केल्याने चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती मोदींनी सोशल मीडियातून दिली आहे.

Iran–Israel Tension
Ajit Pawar plane crash : अपघाताचा अहवाल येताच जय पवारांनी टाकला व्हिडीओ बॉम्ब; पायलटच्या सीटवर विमानाचे मालक अन्...

पंतप्रधान मोदींनी नेतन्याहू यांच्याशी फोनवर झालेल्या संवादाविषयी सांगितले की, मी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधत सध्याच्या स्थितीवर चर्चा केली. सध्याच्या घटनाक्रमांवर भारताकडून चिंताही व्यक्त करण्यात आली आणि म्हटले की, लोकांची सुरक्षा आपली प्राथमिकता आहे. भारताने पुन्हा एकदा लवकरात लवकर संघर्ष थांबण्याच्या आवश्यकतेवर जोर दिल्याचे मोदींनी सोशल मीडियातून सांगितले.

Iran–Israel Tension
Iran–Israel Tension : युध्द पेटताच भारतही हादरला; PM मोदी रात्रीच ठरविणार ‘इमर्जन्सी प्लॅन’, दिल्लीत हालचालींना वेग

संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या चर्चेबाबत सांगताना मोदी यांनी म्हटले आहे की, मी संयुक्त अरब अमरातीवर झालेल्या हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली आणि या हल्ल्यात जीव गमावलेल्या लोकांविषयी संवेदना व्यक्त केली. भारत या कठीण प्रसंगात यूएईसोबत एकजुटीने उभा आहे. यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेची हमी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. तणाव कमी करणे, त्या भागातील शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेचे आम्ही समर्थन करतो, असे मोदींनी म्हटले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com