Iran–Israel Tension : युध्द पेटताच भारतही हादरला; PM मोदी रात्रीच ठरविणार ‘इमर्जन्सी प्लॅन’, दिल्लीत हालचालींना वेग

PM Narendra Modi meeting : केवळ इराण, इस्त्राईलच नव्हे तर अन्य आखाती देशांवरही युध्दाचा मोठा परिणाम झाला आहे. त्याचे थेट परिणाम भारतावरही होऊ शकतात.
Iran–Israel Tension
Iran–Israel TensionSarkarnama
Published on
Updated on

Cabinet Committee on Security meeting : मध्य पूर्व आशिया खंडात युध्दाचा भडका उडला असून इराणवर अमेरिका-इस्त्राईलकडून संयुक्तपणे जोरदार हल्ले केले जात आहे. या हल्ल्यांना इराणकडूनही ताकदीने प्रत्युत्तर दिले जात आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही मोठा संघर्ष पेटला आहे. यापार्श्वभूमीवर भारतही हादरला असून यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

इराण युध्द आणखी पेटल्यास भारतालाही मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामुळेच तमिळनाडूच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज रात्रीच दिल्लीत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS) तातडीने बैठक बोलावली आहे. तमिळनाडूतून येताच ते या बैठकीला उपस्थित राहतील.

केवळ इराण, इस्त्राईलच नव्हे तर अन्य आखाती देशांवरही युध्दाचा मोठा परिणाम झाला आहे. त्याचे थेट परिणाम भारतावरही होऊ शकतात. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ही समिती देशाची सुरक्षा, परराष्ट्र रणनीती आदी बाबतीत सर्वोच्च आणि सर्वात महत्वाची समिती मानली जाते. खुद्द पंतप्रधान समितीचे अध्यक्ष असतात.

Iran–Israel Tension
Maharashtra Government : राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालयांचे होणार ऑडिट; विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

पहिले संकट

युध्दामुळे भारतावर इंधन दरवाढीचे मोठे संकट घोंघावू लागले आहे. भारत ८० टक्के कच्चे तेल आयात करते. त्यातील सर्वात मोठा वाटा आखाती देशांचा आहे. ‘होर्मुज ऑफ स्ट्रेट’ हा मार्ग बंद झाल्यास भारताचा इंधन पुरवठा बंद होण्याची भीती आहे. असे झाल्यास इंधनाचे भाव गगनाला भिडतील, त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती आहे. आजच्या बैठकीत या संकटाला कसे सामोरे जायचे, त्यासाठीचा आपत्कालीन प्लॅन तयार केला जाऊ शकतो.

दुसरे संकट

भारताने इराणमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. प्रामुख्याने चाबहार पोर्टच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये गुंतवणूक केली आहे. हे पोर्ट मध्य आशिया आणि अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्यासाठी भारतासाठी प्रवेशद्वार आहे. हा पोर्टमुळे भारताला पाकिस्तानवर अवलंबून राहावे लागत नाही. युध्दामध्ये पोर्टची हानी झाल्यास भारताच्या गुंतवणुकीवर पाणी फिरू शकते. त्याचा थेट फटका आयात-निर्यातीलाही बसण्याची भीती आहे.

Iran–Israel Tension
BJP Politics : भाजपची मोठी खेळी; मित्रपक्षाचे नामोनिशाण मिटविणार, राज्यसभा निवडणुकाआधी थेट विलीनीकरणाचा डाव

तिसरे संकट

अनेक भारतीय नागरिक सौदी अरेबिया, यूएई, कतार, ओमान, कुवेत बहरीन या आखाती देशांसह मध्य पूर्व आशियातील अन्य देशांमध्ये आहेत. हा आकडा जवळपास ८० ते ९० लाख एवढा आहे. युध्दाचा भडका वाढत गेल्यास लाखो भारतीय नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येऊ सकते. त्यांना मायदेशी आणण्यासाठी किंवा सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी भारताला युध्दपातळीवर प्रयत्न करावे लागतील. याबाबतही आजच्या बैठकीत भारताकडून ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो. आखाती देशांमधील भारतीय कामगारांना यापूर्वीच दुतावासांकडून सुरक्षेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातीलही अनेक नागरिक आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com