Gold demand in India : सोने खरेदीत भारतीय जगात भारी! 'या' राज्यात होते सोन्याची सर्वाधिक विक्री? आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

India gold sales statistics 2026 : भारतात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढत असून एका राज्यात सर्वाधिक सोन्याची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या धक्कादायक आकडे आणि गोल्ड मार्केटमधील ट्रेंड.
Gold demand in India : सोने खरेदीत भारतीय जगात भारी! 'या' राज्यात होते सोन्याची सर्वाधिक विक्री? आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
Published on
Updated on

भारतात सोन्याची किंमत कितीही वाढली तरी सोन्याच्या दागिन्यांची लोकांमधली क्रेझ काही कमी होत नाही. त्यामुळे सोन्याच्या आयातीत भारत आजही जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. सोन्याच्या वाढत्या किमती, परकीय चलन साठ्यावर वाढणारा ताण यामुळे सरकारने सोन्याची खरेदी कमी करण्याचे अवाहन केले आहे तरीही देशामध्ये सोन्याची मागणी कायम आहे.

भारतात दरवर्षी जवळपास 700 ते 800 टन सोन्याची आयात केली जाते. देशांतर्गत सोन्याचे उत्पादन अतिशय कमी असल्यामुळे भारताला आपल्या एकूण गरजेपेकी तब्बल 90% ते 95% सोनं परदेशातून आयात करावे लागते.

Gold demand in India : सोने खरेदीत भारतीय जगात भारी! 'या' राज्यात होते सोन्याची सर्वाधिक विक्री? आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
जगात सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? सोन्याच्या साठ्याची आकडेवारी वाचून थक्क व्हाल...

भारताचे 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचे सोन्याचे आयात बिल सुमारे 71.98 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले होते. भारतीय चलनानुसार हा आकडा 6 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा आयात देशातील परकीय चलन साठ्यावर मोठा दबाव निर्माण करणारा आहे.

भारतात सर्वाधिक सोने पुरवणाऱ्या देशांमध्ये स्वित्झर्लंड अव्वल स्थानावर आहे. स्वित्झर्लंडचा भारताच्या एकूण सोन्याच्या आयातीत 40% वाटा आहे. याशिवाय संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका आणि पेरू यांसारखे देशही भारताला मोठ्या प्रमाणावर सोने निर्यात करतात.

देशातील सोन्याची सर्वाधिक खरेदी दक्षिण भारतात होत असल्याचे चित्र आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही राज्ये सोन्याच्या मागणीत आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, एकट्या केरळचा देशातील एकूण सोन्याच्या वापरामध्ये जवळपास 20% वाटा असल्याचे मानले जाते. त्यामुळे केरळला देशातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.

Gold demand in India : सोने खरेदीत भारतीय जगात भारी! 'या' राज्यात होते सोन्याची सर्वाधिक विक्री? आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
Pratik Yadav inside story : लॅम्बोर्गिनी, सुपरबाईक्स अन् बरंच काही... प्रतीक यादव यांच्या राजेशाही आयुष्याची Inside Story!

भारतातील लग्नसराई आणि सण-उत्सव हे सोन्याच्या विक्रीचे सर्वात मोठे कारण ठरतात. धनत्रयोदशी, अक्षय तृतीया तसेच विवाह सोहळ्यांदरम्यान लोक मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करतात. अनेक कुटुंबांसाठी सोने हे केवळ दागिने नसून सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानले जाते.

महागाई वाढली किंवा आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली की लोकांचा कल पुन्हा सोन्याकडेच वाढतो. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या तरी भारतीयांची सोन्यावरील क्रेझ कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com