

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील पोलीस प्रशासनात मोठी उलथापालथ झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला आहे. एकाच वेळी 10 IPS आणि 18 PPS अशा एकूण 28 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे उत्तर प्रदेश पोलीस दलात खळबळ उडाली असून, सरकारने बदल्यांचे अधिकृत आदेशही जारी केले आहेत.
विविध पोलीस आयुक्तालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. काही अधिकाऱ्यांची जिल्ह्यांमध्ये, तर काहींची महत्त्वाच्या पोलीस युनिटमध्ये बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बदली झालेल्या IPS अधिकाऱ्यांमध्ये 2020, 2021 आणि 2022 च्या बॅचमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या बदल्यांमध्ये पुनीत द्विवेदी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची पोलीस मुख्यालयातून लखनऊ पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नीतू यांची वाराणसी येथून गौतम बुद्ध नगर येथे बदली करण्यात आली आहे. शिव सिंह यांना कानपूरऐवजी आग्रा येथे, तर अमित कुमावत यांना लखनऊहून गाझियाबाद पोलीस आयुक्तालयात पाठवण्यात आले आहे.
याशिवाय किरण यादव यांची लखनऊ पोलीस आयुक्तालयातून एएनटीएफ मुख्यालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुष्कर वर्मा यांना प्रयागराजहून फतेहगड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आदित्य यांची आग्रा येथून बदाऊन येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.