Iran News : अमेरिका-इराण युद्धाचे जगावर परिणाम झाले आहेत.इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनी जहाजांना प्रवास करण्यास बंदी केल्याने भारतात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी इराणने भारतीय झेंडा असलेल्या तेल जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनी जाण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर पुन्हा येथून प्रवासाला बंदी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणाचे राष्ट्रध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधला. या संवादाच्या काही तासांमध्येच इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या दोन एलपीजी जहाजांना प्रवासाची परवानगी दिल्याची माहिती आहे.
'राॅयटर्स' वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात भारताच्या दोन एलपीजी जहाजांना प्रवासाची परवानगी वृत्तसंस्थेनी दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, इराणाच्या या निर्णयामुळे भारतातील गॅस पूरवठा सुरळीत होणार आहे.
भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, भारत हा इराणाचा सर्वात जवळचा मित्र आहे. याचे दोन ते तीन तासांत सकारात्मक परिणाम दिसून येतील, असे देखील त्यांनी सांगितले होते. त्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारताचा झेंडा असलेले दोन एलपीजी गॅस जहाजांना जाण्यास परवानगी दिल्याचे वृत्त समोर आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.