Iran attack ships : भारताच्या दोन जहाजांवर इराणच्या हल्ल्यानंतर मोदी सरकार अलर्टवर; ‘होर्मुझ’मध्ये उभ्या असलेल्या जहाजांवर धाडला महत्वाचा निरोप

Iran attack ships, Indian Navy alert Hormuz Strait news : होर्मुझमधून जवळपास ११ भारतीय जहाजं सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. ता. १८ एप्रिलला देश गरिमा हे शेवटचे जहाज तिथून निघाले. त्याचदिवशी जग अर्णव आणि सन्मार हेराल्ड या दोन जहाजांवर इराणकडून गोळीबार करण्यात आला होता.
Iran attack Indian ships
Iran attack Indian shipsSarkarnama
Published on
Updated on

Iran India tensions : इराण आणि अमेरिकेतील शांती वार्ता फिस्कटल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक पुन्हा थांबविण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढत चालला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी भारताच्या दोन जहाजांवर इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्सने (IRGC) गोळीबार केल्याची घटना समोर आली. त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे.

भारतीय नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये असलेल्या भारतीय जहाजांची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी पावले उचलली आहे. तर केंद्र सरकारनेही भारतीय तिरंगा असलेल्या जहाजांच्या सुरक्षेबाबत नव्याने सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरही तिथून निघण्याच्या सुचना सरकारने दिल्या आहेत.

होर्मुझमधून जवळपास ११ भारतीय जहाजं सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. ता. १८ एप्रिलला देश गरिमा हे शेवटचे जहाज तिथून निघाले. त्याचदिवशी जग अर्णव आणि सन्मार हेराल्ड या दोन जहाजांवर इराणकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे या जहाजांवर परत फिरावे लागले. देश गरिमा हे जहाज २२ एप्रिलपर्यंत भारतीय बंदरावर दाखल होऊ शकते. भारतीय नौसेनेच्या सुरक्षाकड्यामध्ये हे जहाज आणले जात आहे.

Iran attack Indian ships
MLC Election : विधानपरिषदेत पुण्याची लॉटरी लागणार? ‘या’ नेत्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय, नावे आली समोर...

भारतीय जहाजे इराणच्या बंदर अब्बासच्या किनाऱ्यालगत असलेल्या लारक बेटाजवळ आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग या इराणी बेटाच्या आणि ओमानच्या ग्रेट क्वॉइन बेटाच्या दरम्यान येतो. त्यावर पूर्णपणे इराणचे वर्चस्व असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे इंधन वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.

Iran attack Indian ships
Modi Government news : PM मोदींचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागलेल्या नेत्यावर देशाची मोठी जबाबदारी

भारतीय जहाजांना लारक बेटाजवळून जाणे आता जिकीरीचे मानले जात आहे. भारतीय नौदलाने हिरवा कंदील दाखविल्याशिवाय जहाजांना सामुद्रधुनी पार न करण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सद्यस्थितीत १४ भारतीय जहाजे होर्मुझ पार करण्यासाठी प्रतिक्षेत आहेत. भारतीय नौदल या जहाजांच्या सातत्याने संपर्कात आहे. त्यासाठी नौदलाचे सात जहाजे तैनात करण्यात आली आहेत. भारतीय मालवाहतूक जहाजांनी सामुद्रधुनी पार करताच त्यांना नौदलाकडून सुरक्षा पुरविली जात आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com