Israel Iran War : इराण-इस्रायल संघर्षाचा भडका; तणावपूर्ण स्थितीत भारतीय दूतावासांकडून हेल्पलाईन जारी

US Israel attack Iran : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृ्त्यू झाला असून इराण-इस्रायल संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासांकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.
Israel Iran War
Israel Iran Warsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर UAE मधील भारतीय नागरिकांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.

  2. विनाकारण प्रवास टाळण्याचे आणि अधिकृत सुरक्षा मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  3. आपत्कालीन परिस्थितीत दूतावासाने जारी केलेल्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

New Delhi News : इराण-इस्रायल संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता असून अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात खेमेणींसह त्यांचा जावई, मुलगी आणि नात यांच्या देखील मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत असून याचा थेट परिणाम विमान प्रवासावर झाला आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे यूएई, इस्रायल, कतार, इराण आणि सौदी अरेबियामधील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून अनेक भारतीय येथे अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासांकडून या ५ देशांसाठी २४x७ हेल्पलाईन जारी करण्यात आले आहेत.

याआधी भारत सरकारने UAE मधील निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली होती. ज्यात पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीयांना सतर्क राहावे असे म्हटले होते. तसेच अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले होते.

यानंतर आता भारत सरकारने तणाव निर्माण झालेल्या या देशांमधील दूतावासांचे हेल्पलाइन क्रमांक जारी केले असून ते २४x७ सुरू असतील. येथे त्या त्या देशातील भारतीय लोकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तर त्या त्या देशांच्या परिस्थितीवर दूतावासाकडून नियमितपणे लक्ष ठेवण्यात यावे अशाही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Israel Iran War
US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धात भारत कोणाच्या बाजूने? परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका; "इराण आणि..."

महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

आपत्कालीन संपर्क तपशील

रामल्लाह (पॅलेस्टाईन)

फोन : +970592916418

ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार)

फोन : 00974-55647502

ईमेल : cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया)

फोन : 00-966-11-4884697

WhatsApp : 00-966-542126748

टोल फ्री : 800 247 1234

ईमेल : cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल)

फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378

ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण)

फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)

टोल फ्री : 800-46342

WhatsApp : +971543090571

ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत

फोन : +96565501946

ईमेल : community.kuwait@mea.gov.in

बाहरीन

फोन : 00973-39418071

मस्कत

टोल फ्री : 80071234

WhatsApp : +96898282270

ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन

फोन : 00962-770 422 276

बगदाद (इराक)

फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899

वेबसाइट :eoibaghdad.gov.in

ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

Israel Iran War
Israel vs Iran war : भारतीयांच्या आयुष्यावर होणार 4 मोठे परिणाम : इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धाने चुकला काळजाचा ठोका

FAQs :

1. हा सल्ला का देण्यात आला आहे?
इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य सुरक्षा धोके लक्षात घेऊन हा सल्ला देण्यात आला आहे.

2. भारतीय नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
विनाकारण प्रवास टाळावा, अधिकृत सूचना पाळाव्यात आणि सतर्क राहावे.

3. हा सल्ला कोणाकडून जारी करण्यात आला आहे?
भारतीय दूतावास आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून हा सल्ला देण्यात आला आहे.

4. आपत्कालीन परिस्थितीत काय करावे?
दूतावासाने दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा.

5. सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे?
प्रादेशिक तणाव वाढलेला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा सल्ला जारी करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com