US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धात भारत कोणाच्या बाजूने? परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका; "इराण आणि..."

Ayatollah Khamenei death claim : इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याला इराणकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण जगात तिसरं महायुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
India’s Ministry of External Affairs urges restraint and diplomacy amid escalating US-Israel Iran war tensions and claims surrounding Ayatollah Khamenei.
India’s Ministry of External Affairs urges restraint and diplomacy amid escalating US-Israel Iran war tensions and claims surrounding Ayatollah Khamenei.Sarkarnama
Published on
Updated on

US Israel Iran War : संपूर्ण जगात खळबळ उडवून देणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याला इराणकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण जगात तिसरं महायुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच इस्रायल दौऱ्यावर जाऊन आले आणि त्यानंतर लगेचच हे युद्ध भडकलं.

त्यामुळे या युद्धात भारताची भूमिका नेमकी काय आहे याकडे संपूर्ण देशासह जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धावर भाष्य केलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आणि संवाद व राजनैतिकतेद्वारे तणाव सोडवण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय या संघर्षाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

India’s Ministry of External Affairs urges restraint and diplomacy amid escalating US-Israel Iran war tensions and claims surrounding Ayatollah Khamenei.
Gokul News: 'गोकुळ'च्या राजकारणात खळबळ; एक ना दोन तब्बल 1200 ठराव रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, नेत्यांचं टेन्शन वाढलं

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, "भारत सर्वांना संयम बाळगण्याचं, संघर्ष टाळण्याचं तसंच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आवाहन करत आहे. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्ग अवलंबला पाहिजे. भारत इराण आणि आखाती प्रदेशातील अलीकडील घडामोडींबद्दल चिंता व्यक्त करत आहे.", असं म्हणत भारताने दोन्ही बाजूंना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

India’s Ministry of External Affairs urges restraint and diplomacy amid escalating US-Israel Iran war tensions and claims surrounding Ayatollah Khamenei.
Ayatollah Khamenei Death : मोठी बातमी! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी ठार

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. तर दुसरीकडे शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेने इराणी राष्ट्रपती भवनासह अनेक ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यामध्ये 85 शाळकरी मुलांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com