Ayatollah Khamenei Death : मोठी बातमी! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी ठार

US Israel attack Iran : इराणचा सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृ्त्यू झाला असल्याची पुष्ठी इराणच्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Iran's threat to close the vital Strait of Hormuz may trigger a global oil and fuel crisis.
Ayatollah Khamenei Death sarkarnama
Published on
Updated on

Iran News : इस्त्रायला, अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी देखील या बातमीची पुष्टी करत खेमेणी यांची मृत्यू झाल्याचे जाहीर केले असून खेमेणींसह त्यांचा जावई, मुलगी आणि नात यांच्या देखील मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून शनिवारपासून इरानवर हल्ले केले होते. त्यानंतर अयातुल्ला अली खामेनी यांन सुरक्षास्थळी हालवण्यात आले असल्यचे सांगण्यात येत होते. इस्त्रायलकडून तेहरीन शहरावर हल्ला करण्यात आला होता. इराणकडून देखील पलटवार करत अमेरिकेचे लष्करी तळावर हल्ला केला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्विट करत म्हटले की, गेल्या 47 वर्षापासून असलेली आयातोल्ला राजवटीत घोषणा दिल्या. त्यांनी आमचे रक्त सांडले, अनेक अमेरिकन नागरिकांची हत्या केली आणि स्वतःच्या जनतेवरही अत्याचार केले. अशा रक्तरंजित दहशतवादी राजवटीला अण्वस्त्रांनी सुसज्ज होऊ देणे मान्य नाही; अन्यथा ती संपूर्ण मानवजात संपवेल. हा दहशतवाद आम्ही संपवला आहे. आता इराणमधील सर्व घटकांसाठी — पर्शियन, कुर्द, अझेरी, बलुच आणि अहवाझी अत्याचाराच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्र आणि शांतताप्रिय इराण घडवण्याची वेळ आली आहे.

Iran's threat to close the vital Strait of Hormuz may trigger a global oil and fuel crisis.
Gulabrao Patil News: मोठी बातमी! सरकारच्या 25 हजार योजना अपूर्ण,142 कंत्राटदार काळ्या यादीत; मंत्री गुलाबराव पाटलांची कबुली

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इतिहासातील सर्वात वाईट लोकांपैकी एक असलेल्या खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. हा केवळ इराणच्या लोकांसाठी नाही तर अमेरिकन लोकांसाठी आणि जगभरातील अनेक देशांमधील लोकांसाठी हा न्याय आहे.

खामेनी आमच्या आमच्या गुप्तचर आणि अत्यंत अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टम्सपासून वाचू शकला नाही. आम्ही इस्रायलसोबत काम केले. आता इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची ही एकमेव मोठी संधी आहे. इराणमधील आयआरजीसी, लष्करी आणि इतर सुरक्षा आणि पोलिस दलांना आता लढायचे नाही.

Iran's threat to close the vital Strait of Hormuz may trigger a global oil and fuel crisis.
Karnatak Politics: कर्नाटकच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ? माजी पंतप्रधानांंनीच टाकला बॉम्ब, मोदी-शहांचं नाव घेत म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com