

Israel Iran War Update : इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धाने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या युद्धाच्या झळा जगभरातील अनेक देशांना सोसाव्या लागत आहेत. युद्धामुळे काही देशांमध्ये इंधन आणि गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे हे युद्ध कधी संपणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धा संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. आखाती युद्धात अमेरिकेचा विजय झाल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता युद्धाला पूर्णविराम मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला करताना ट्रम्प यांनी इराणचे नौदल संपले असून त्यांचे सर्व मोठे नेते मारले गेले आहेत. इराणचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली असून आपण युद्ध संपवण्याच्या खूप जवळ आहोत. कधीही मिळवला नाही असा विजय आम्ही मिळवला आहे. आम्ही आमची उद्दीष्ट आम्ही पूर्ण केली असून इराणला अण्वस्त्रसज्ज देश होण्यापासून रोखल्याचा मला अभिमान आहे, असंही त्यांनी म्हटलं.
तर यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकेला होर्मुझची गरज नसल्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, अमेरिकेकडे मुबलक तेल आणि गॅस साठा आहे त्यामुळे आम्हाला होर्मुझची गरज नाही. मात्र, आम्ही मित्रराष्ट्रांना मदत करू. हॉर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गाची मित्र राष्ट्रांनी काळजी घ्यावी. तो आपल्या ताब्यात घ्यावा आणि त्याचे जतन करावे, असं आवाहन त्यांनी केलं.
एकीकडे ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील मित्रराष्ट्र इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवेत आणि बहरीन यांचेही आभार मानले. आणि या या मित्र राष्ट्रांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू देणार नसल्याचं आश्वासन ट्रम्प यांनी यावेळी दिलं. तर दुसरीकडे त्यांनी आम्ही नाटोतूनही बाहेर पडू, असा इशारा त्यांनी यावेळी नाटोतील देशांना दिला.
दरम्यान, मागील चार आठवड्यात, आपल्या सैन्याने युद्ध भूमिवर जलद, निर्णायक आणि जबरदस्त विजय मिळवला. 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत दहशतवादाला राज्याश्रय देणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असणारा इराण आमचं लक्ष्य होतं. यामध्ये आम्ही विजय मिळवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
मात्र, इराणने युद्धविरामाची विनंती केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असला तरी होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाईल, तेव्हाच आम्ही इराणच्या युद्धविरामाच्या विनंतीचा विचार करू, असंही स्पष्ट केलं आहे. जर होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर आम्ही इराणचा विनाश करणं सुरूच ठेवू असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. त्यामुळे आता यावर इराण नेमकी काय भूमिका घेणार आणि ट्रम्प यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.