Jagdeep Dhankhar: "उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा आरोग्याच्या समस्येमुळं दिला नव्हता तर..."; जगदीप धनखड यांचा खळबळजनक खुलासा

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळं मोठं वादळ निर्माण झालं होतं.
Jagdeep Dhankhar big revelation about his resigned from the post of Vice President.
Jagdeep Dhankhar big revelation about his resigned from the post of Vice President.
Published on
Updated on

Jagdeep Dhankhar: देशाचे माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला होता. सर्वोच्चपदाचा अशा पद्धतीनं अचानक राजीनामा दिल्यानं देशात मोठं वादंग निर्माण झालं होतं. मोदी सरकारनंच धनखड यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं अशा पद्धतीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

पण विशेष म्हणजे या राजीनाम्यामागं धनखड यांनी आपल्या आरोग्याचं कारण सांगितलं होतं. पण आता त्यांनीच आपण आरोग्याच्या कारणानं राजीनामा दिला नव्हता असं म्हटल्यानं खळबळ उडाली आहे. कारण मग त्यांनी नेमका कोणत्या कारणासाठी ही कृती केली याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

Jagdeep Dhankhar big revelation about his resigned from the post of Vice President.
PMC News: पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयांची हद्द, नावं बदलली! तुमचा प्रभाग कुठल्या वॉर्ड ऑफिसमध्ये येणार जाणून घ्या?

प्रकृती अस्वास्थ्यामुळं राजीनामा नाही

एका कार्यक्रमात बोलताना नुकतेच जगदीप धनखड यांनी आपण कुठल्या कारणासाठी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला, याचा खुलासा केला आहे. राजस्थानातील सादुलपूर इथं या कार्यक्रमात धनखड म्हणतात, रामसिंग यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. पण जेव्हा कधी माझ्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा रामसिंग यांनी मला साथ दिली. असं म्हणतात की पहिलं सुख हे निरोगी असण्यात आहे, त्यामुळं मी कधी आरोग्याच्या बाबतीत हेळसांड केली नाही.

मी जेव्हा म्हटलं होतं की, मी उपराष्ट्रपतीपद त्यागतो आहे तेव्हा मी कधीही हे म्हटलं नाही की आजारी आहे. मी म्हटलं होतं की, मी आरोग्याला महत्व देत आहे. आरोग्याला महत्व द्यायलाही हवं, कारण आपल्या शास्त्रांमध्येही सांगितलं आहे. मी अनेकदा अशा गोष्टी बोललो ज्यामुळं लोकांना त्याचा राग यायचा पण मी थेटपणे बोलायचो, असंही पुढे जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.

Jagdeep Dhankhar big revelation about his resigned from the post of Vice President.
Sunetra Pawar: 40 वर्षे वादळाशी संसार अन्...; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताच अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक

पुन्हा प्रश्न उपस्थित

दरम्यान, जगदीप धनखड यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यासाठी दिलेल्या कारणाबाबतच महत्वाचा खुलासा केल्यानं आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण त्यांच्या या खुलाशामुळं आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे की, जर धनखड यांनी आपल्या अस्वास्थाच्या कारणास्तव राजीनामा दिला नव्हता तर मग नेमकं त्यांच्या राजीनाम्यामागील कारण काय होतं. कारण ही गोष्ट त्यांनी अद्यापही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं सहाजिकच त्यांच्या राजीनाम्यामागे काहीतरी राजकीय महत्वाचं कारणच असावं असंही बोलल जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com