Sunetra Pawar: 40 वर्षे वादळाशी संसार अन्...; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताच अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक

Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी डोम इथं पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ही प्रक्रिया पार पडली.
Sunetra Pawar
Sunetra Pawar
Published on
Updated on

Sunetra Pawar Elected as National President of NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी डोम इथं पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर पद स्विकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी दिवंगत अजितदादांच्या आठवणीत त्या भावूक झाल्या. तसंच ४० वर्षे मी एका वादळाशी संसार केला, अशा शब्दांत अजित पवारांच्या संघर्षाचा त्यांनी उल्लेख केला.

Sunetra Pawar
Sunetra Pawar: अखेर शिक्कामोर्तब! सुनेत्रा पवार बनल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा; पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात झाली घोषणा

सुनेत्रा पवार म्हणाल्या, "अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा साधारण अडीच वर्षांचाच कालावधी मिळाला. पण या काळात त्यांनी आख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, पक्षाचा विस्तार केला. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिलं, कष्ट, समर्पन आणि काटेकोर नियोजन असेल तर आपल्या पक्षाची ताकद तिप्पटीनं वाढवली. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कालावधीत लोकसभा, महाराष्ट्राची विधानसभा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू-काश्मीर, बिहार या राज्यातील विधानसभा, महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पक्षानं लढवल्या. या कालावधीत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, अनेक संकट आली, अनेक तांत्रिक अडचणी आल्या असं असताना सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं सगळीकडंच दमदार कामगिरी केली.

Sunetra Pawar
Marathi School: राज्यात 2000 मराठी शाळा खरंच बंद पडल्या? मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत थेट आकडेवारीच मांडली; म्हणाले, 85 टक्के शाळा...

या अडीच वर्षाच्या अल्पावधीत सुद्धा त्यांनी आपलं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर सिद्ध केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते सिद्धच करुन दाखवायचे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशाच्या मातीशी, माणसांशी नात सांगणारा आणि जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. आपल्याला माहितीच आहे की, आपल्या देशाची निर्मितीच मूळ संघर्षातून झाली आहे, त्याचप्रमाणं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघर्षातून स्थापन झाला आणि संघर्ष करतच मोठा झाला. तब्बल २७ वर्षांची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण करत आपला पक्ष सध्या तारुण्यात आहे असं म्हणावं लागेल. आपल्याला कार्यकर्त्यात जोश निर्माण करायचं आहे त्यांच्यात उत्साह आहे. त्या उत्साहाला योग्य दिशा देण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे.

Sunetra Pawar
Gokul Election : गोकुळमध्ये कोणाकडे किती ताकद? सतेज पाटील की हसन मुश्रीफ कोण ठरू शकते वरचढ? शिवसेना-भाजपकडे किती संचालक? वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून मी सुद्ध प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांप्रमाणेच राष्ट्रवादीशी जोडलेली आहे. राजकारण आणि समाजकारण करताना माझ्यासाठी सर्वकाही नवं नव्हतं. दादांसारख्या वादळासोबत मी ४० वर्षे संसार केलेला आहे. त्यामुळं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुमच्या सर्वांच्या पाठबळामुळं आणि तुमच्या साथीनं आजिबात अशक्य नाही याचा मला विश्वास आहे, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com