माजी मुख्यमंत्र्यांचं ब्राह्मणांबद्दल वाद्रगस्त विधान अन् पडली ठिणगी

माजी मुख्यमंत्र्यांनी हिंदू धर्म आणि ब्राह्मणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उडाला आहे.
Jitan Ram Manjhi
Jitan Ram ManjhiSarkarnama
Published on
Updated on

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपचे (BJP) सरकार आहे. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा हा पक्ष राज्यातील सत्तेत सहभागी आहे. याच मांझी यांनी हिंदू धर्म आणि ब्राह्मणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उडाला आहे. ब्राह्मण संघटनांनी ठिकठिकाणी मांझी यांचे पुतळे जाळून निषेध केला आहे.

मांझी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी हिंदू धर्माच्या प्रथा पाळू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, त्यांना ब्राह्णणांबद्दल अपशब्द वापरले आहेत. दलित ग्राहकांकडून हे ब्राह्मण दक्षिणा घेतात परंतु, त्यांच्याकडून अन्न स्वीकारत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू झाला आहे. ब्राह्मण संघटना आणि भाजपच्या नेत्यांकडून मांझींचा निषेध करण्यात येत आहे. अनेक ब्राह्मण संघटनांनी मांझी यांचा पुतळा जाळला आहे.

Jitan Ram Manjhi
ममतांचा काँग्रेसला दे धक्का! आणखी एक बडा नेता गळाला

दरम्यान, मांझी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. त्यांनी नितीशकुमार यांच्याकडे 1 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. ते म्हणाले की, माझा मुलगा संतोष कुमार यांच्या फंडात 1 हजार कोटी रुपये न टाकल्यास मी महाआघाडीकडे पलटी मारेन. माझ्या मुलालाही मी 1 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा आराखडा बनवण्यास सांगितला आहे. या पैशातून अनेक योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. गया जिल्ह्यात या निधीतून विकासकामे केली जातील. आता मी आयुष्यातील अंतिम खेळी खेळत आहे. त्यामुळे विकासासाठी जे करता येईल ते मी करेन.

Jitan Ram Manjhi
लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोला आक्षेप पडला महागात; उच्च न्यायालयाचा दणका

मागील काही काळापासून भाजपचे नेते नितीशकुमार यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. याला जेडीयूचे नेतेही उत्तर देऊ लागल्याने सत्ताधारी आघाडीत जुंपल्याचे चित्र अनेक वेळा दिसू लागले आहेत. त्यातच आता मांझींची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी नितीशकुमार यांनी भाजपच्या महिला आमदाराबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. याची तक्रार महिला आमदार निक्की हेमब्रम यांनी थेट पक्ष नेतृत्वाकडे केली होती. यामुळे दोन्ही पक्षांतील बेबनाव समोर आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com