कन्हैयाच्या प्रवेशाआधीच काँग्रेसमध्ये कलह सुरू

एका बड्या नेत्यानं पक्षाला घरचा आहेर देत कुमारच्या पक्षप्रवेशालाच विरोध केल्याचे बोलले जात आहे.
Kanhaiya Kumar
Kanhaiya KumarFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (CPI) नेता व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) मंगळवारी (ता. 28) काँग्रेसमध्ये दाखल होत आहे. त्यावरून आता काँग्रेसमध्येच कलह सुरू झाला आहे. एका बड्या नेत्यानं पक्षाला घरचा आहेर देत कुमारच्या पक्षप्रवेशालाच विरोध केल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस नेते व नाराज गट असलेल्या जी 23 मधील मनीष तिवारी यांनी एक ट्विट करून कन्हैया कुमारच्या प्रवेशावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'काही कम्युनिस्ट नेते काँग्रेसमध्ये येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता बहुतेक 1973 मध्ये लिहिलेले 'कम्युनिस्ट्स इन काँग्रेस' हे पुस्तक पुन्हा वाचायला हवे. काही गोष्टी जेवढ्या बदलतात, तेवढ्याच समान राहतात. मी आज पुन्हा वाचले आहे,' असं तिवारी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Kanhaiya Kumar
'सीपीआय' सोडताना कन्हैयाने पक्षाच्या कार्यालयातील 'एसी'ही सोबत नेला

तिवारी यांच्यासह आणखी काही नेत्यांचा कन्हैयाच्या प्रवेशाला विरोध असल्याचे समजते. कन्हैया अनेकदा वादात अडकला आहे. त्याचा फटका काँग्रेसलाच बसू शकतो. त्यामुळे या नेत्यांचा विरोध असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये फायदा होईल, असा दावा काही नेत्यांचा आहे. भाजपने ही संधी साधत काँग्रेसवर पलटवार कऱण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस आता तुकडे-तुकडे गँगसोबत हातमिळवणी करत असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे.

दरम्यान, महात्मा गांधी जयंतीदिनी कन्हैया कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये दाखल होणार होते. परंतु, हा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अलिकडे आणण्यात आला आहे. हे दोघेही आज हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीदिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दोघांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज दुपारी होणार आहे. या दोघांच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात अतिशय आक्रमक आणि लोकप्रिय असलेले दोन तरुण चेहरे काँग्रेसला मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

देशातील लोकप्रिय तरुण नेता कन्हैया

कन्हैया कुमार याने 2019 मध्ये भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांच्याविरोधात बिहारमधील बेगुसराई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत कन्हैयाचा पराभव झाला होता. मागील तीन दशकांपासून बिहारमधील काँग्रेसच्या विधानसभेच्या जागा सातत्याने कमी होत आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला निवडणूक लढवलेल्या 70 पैकी केवळ 19 जागा मिळाल्या.

कन्हैया व राहुल गांधी यांची आधी दोनदा भेट झाली आहे. काँग्रेसमध्ये येण्याबाबत वाटाघाटी सुरू असून त्या अंतिम टप्प्यात आहेत, असे बिहारमधील काँग्रेसच्या एका नेत्यानं काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. कन्हैया कुमार हा मूळचा बिहारचा असल्यानं या राज्यात त्याच्यामागे कार्यकर्त्यांची फौज आहे. तसेच, काँग्रेसमध्ये येता डाव्या पक्षांती काही नेतेही त्याच्यासोबत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com