

Congress Karnataka politics : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेंच सुरू असतानाच एका ज्येष्ठ नेत्याने बॉम्ब टाकला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ३-४ महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविल्याचा दावा या नेत्याने केला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. एन. राजण्णा यांनी हा दावा करत राज्याच्या राजकारणात ट्विस्ट आणला आहे. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दोन पदे सांभाळतात. त्यावरून काही नेत्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त केली जाते. त्यातच काही दिवसांपासून शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात काँग्रेसला अडीच वर्षे पूर्ण झाली असून मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आता हे पद सोडावे, असे पक्षातील एका गटाचे म्हणणे आहे.
उरलेल्या अडीच वर्षांसाठी शिवकुमार यांना हे पद द्यावे, अशी मागणी काही आमदार उघडपणे करत आहेत. मागील काही महिन्यांपासून दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यापार्श्वभूमीवर आज दिल्लीत दोन्ही नेत्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचीही भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र, ही भेट केवळ राज्यसभा निवडणुकीबाबत होती, असा दावा आता नेत्यांकडून केला जात आहे.
सध्यातरी सिध्दरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील, असा संदेश पक्षश्रेष्ठींकडून दिला गेल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर राजण्णा यांनी शिवकुमार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिवकुमार यांनी ३ ते ४ महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. शिवकुमार गटातील नेत्यांकडून हा दावा फेटाळण्यात आल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
सिध्दरामय्या हे मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याने शिवकुमार हे प्रचंड नाराज असल्याची काँग्रेसमध्ये चर्चा आहे. शिवकुमार यांच्या गटातील आमदारांनी काही दिवसांपूर्वीच त्यासाठी दिल्लीत ठाण मांडले होते. पण काहीच तोडगा निघाला नव्हता. आज दोन्ही नेते एकाचवेळी दिल्लीत दाखल झाल्याने मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्यातरी कोणत्याही निर्णयाविनाच दोन्ही नेते राज्यात परतण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.