ban on item songs : सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक मिरवणुकांमध्ये ‘ डीजे अन् आयटम साँग्स’ वर बंदी? सांस्कृतिक मंत्र्यांचे संकेत

Karnataka Government ban on DJs and item songs at cultural events : सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम आणि अश्लील ‘आयटम गाणी’ वाजवल्याने स्थानिक संस्कृती आणि परंपरांचे नुकसान होत असल्याचे मत अनेकांनी या अगोदर मांडले आहे.
Karnataka Government Sound System And item songs ban
Karnataka Government Sound System And item songs ban sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्नाटक सरकार धार्मिक मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये साउंड सिस्टीमवर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे.

  2. आयटम गाणी वाजवण्यावर बंदी घालण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले.

  3. ध्वनी प्रदूषण आणि संस्कृतीचे नुकसान यामुळे हा निर्णय विचाराधीन आहे.

Karnataka Cultural Policy News : राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावणे तसेच ‘आयटम गाणी’ वाजवण्यावर बंदी घालण्याचे संकेत कन्नड व संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी यांनी बुधवारी (ता. १८) विधानसभेत दिले. हा विषय सभागृहात उपस्थित करत कामगार मंत्री संतोष लाड यांनी साउंड सिस्टीमवर निर्बंध घालण्याची जोरदार मागणी केली. प्रत्येक जयंतीत साउंड सिस्टीम ही मोठी समस्या बनली आहे. देव-देवींच्या मिरवणुकाही आता साउंड सिस्टीम आणि आयटम गाण्यांशिवाय पुढे जात नाहीत, ही लाजीरवाणी बाब आहे. यामुळे संस्कृतीचे नुकसान होत आहे.

यावर उत्तर देताना मंत्री तंगडगी म्हणाले की, या संदर्भात लवकरच आदेश काढण्यात येतील. साउंड सिस्टीममुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यांनी या निर्णयासाठी सर्व पक्षांचे, विशेषतः भाजपचे सहकार्य आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान, शिमोग्याचे भाजप आमदार एस. एन. चन्नबसप्पा यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. ‘तुम्हाला साउंड सिस्टीम नको असतील; पण आम्हाला ते आवश्यक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अजानवरही बंदी घालणार का?’ असा सवाल त्यांनी केला.

Karnataka Government Sound System And item songs ban
Karnataka Assembly Session : अधिवेशन सुरू असतानाच अध्यक्षांच्या नाराजीचा स्फोट; मंत्र्यांकडून उत्तर न मिळाल्याने सभागृहातून वॉकआउट अन् निलंबनाचा आदेश

सभापती यू. टी. खादर यांनी हस्तक्षेप करत स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाने केवळ ध्वनिप्रदूषणासाठी मर्यादा निश्चित केल्या आहेत आणि त्या सर्व सरकारांनी पाळणे आवश्यक आहे.

‘आनेगुंडी उत्सव सुरू करा’

याचवेळी भाजपचे जनार्दन रेड्डी यांनी कोप्पळ जिल्ह्यातील आनेगुंडी उत्सव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र उत्सव असावा, अशी मागणी वाढत असल्याचे मंत्री तंगडगी यांनी नमूद केले. ‘पूर्वी दसरा फक्त म्हैसूर, मडिकेरी आणि चामराजनगरपुरते उत्सव मर्यादित होते, नंतर शिमोगा उत्सवाचा समावेश झाला’, असे त्यांनी सांगितले.

Karnataka Government Sound System And item songs ban
Karnataka CM : मुख्यमंत्रिपदाचा कर‘नाटकी’ घोळ! सिद्धरामय्या–शिवकुमार आमनेसामने, काँग्रेसची कोंडी

FAQs :

1. कर्नाटक सरकार कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत आहे?
साउंड सिस्टीम आणि आयटम गाण्यांवर निर्बंध घालण्याचा विचार आहे.

2. हा निर्णय का घेतला जात आहे?
ध्वनी प्रदूषण आणि सांस्कृतिक हानी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.

3. कोणत्या कार्यक्रमांवर हा नियम लागू होईल?
धार्मिक मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर लागू होऊ शकतो.

4. या विषयावर कोण बोलले?
मंत्री शिवराज तंगडगी आणि संतोष लाड यांनी हा मुद्दा मांडला.

5. याचा नागरिकांवर काय परिणाम होईल?
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आवाजावर नियंत्रण येऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com